राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे. राज्य परिवहन मंडळाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होण्याचे संकेत परिवहन मंडळाने दिले आहेत. आपल्या कर्मचाऱ्यांना आनंदात आणि उत्साहात वर्षातील सर्वात मोठा दिवाळ सण साजरा यावा यासाठी कर्मचाऱ्यांना पगार दिवाळीपूर्वीच करण्याचा प्रस्ताव महामंडळाने राज्य सरकारकडे पाठवलाय.
एवढेच नाही तर सर्व एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट मिळावी यासाठी तातडीने निधी उपलब्ध करून देण्याची मागणी देखील महामंडळाने सरकारकडे केली आहे. तसे पाहायला गेल्यास राज्यात सणासुदीच्या दिवसांमध्ये प्रवासासाठी एसटीचा वापर अधिक केला जातो दिवाळी सणाच्या निमित्ताने गर्दीच्या हंगामात प्रवाशांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे महामंडळाला चांगला महसूलही या काळामध्ये मिळतो त्यासाठी सणासुदीला सेवा देणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी यांना गोड व्हावी यासाठी महामंडळाला हालचाली सुरू केल्यात एसटी कर्मचाऱ्यांचा पगार प्रत्येक महिन्याच्या सात तारखेला होतो.
यंदा सोमवारी 28 ऑक्टोबरला वसुबारस ते रविवारी 3 नोव्हेंबरला भाऊबीज दरम्यान दिवाळीचा सण साजरा होत आहे. ऑक्टोबर महिन्याचा पगार सात नोव्हेंबर रोजी अपेक्षित आहे. मात्र दिवाळी सणानिमित्त खरेदीसाठी ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात पगार जमा करण्याचा महामंडळाचा मानस आहे.
निधी मिळवण्यासाठी सरकारकडे प्रस्ताव
याकरिता राज्य सरकारकडून लवकर निधी मिळवण्यासाठी सरकारकडे प्रस्ताव पाठवण्यात आल्याची माहिती आहे. दिवाळी सणानिमित्त एसटी कर्मचाऱ्यांना 5000 रुपयांची दिवाळी भेट देण्यात येते यंदाही भेट कर्मचाऱ्यांना मिळण्यासाठी अतिरिक्त निधीची मागणी देखील महामंडळांना राज्य सरकारकडे केली आहे. त्यामुळे यंदा दिवाळी आधी पगार मिळणार की दिवाळी सण उसनवारीने साजरा करावा लागणार याकडे एसटी कर्मचाऱ्यांच्या नजरा लागल्यात.