अबब!! अडीच लाखाची म्हैस; रोज देतेय 25 लिटर दूध

0
2
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गुजरात राज्यातील जुनागढ येथून आणलेल्या गीर जाफर म्हशींची जोरदार चर्चा सुरु आहे. या जातीच्या म्हशीची विक्री शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत तब्बल 2.60 लाख रुपयांना झाली आहे. या म्हशीला मागणी वाढली असून तिची खासियत म्हणजे ती 24 ते 25 लिटर दूध देते. या विक्रीमुळे शिरपूर बाजार समितीतील हे विक्रीचे दर अद्वितीय (Unique) ठरले आहेत. तसेच सगळ्यात महाग म्हैस म्हणून तिच्याकडे पाहिले जात आहे.

अडीच लाखाची म्हैस –

शिरपूर खंडेराव महाराज यात्रा निमित्त दरवर्षीप्रमाणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात गुरांचा बाजार भरतो. यावेळी, व्यापारी अरुण बडगुजर यांनी जुनागढ येथून आणलेली गीर जाफर जातीची म्हैस शेतकरी धनराज साळुंके यांनी 2.60 लाख रुपयांमध्ये विकत घेतली. साळुंके यांच्या ताब्यात यापूर्वी 70 म्हशी आहेत, पण गीर जाफर जातीच्या म्हशीला विशेष आकर्षण असल्याने त्यांनी ती खरेदी केली.

म्हैस 15 ते 16 महिने दूध देते –

गीर जाफर ही म्हैस दिवसाला 25 लिटर दूध देते आणि गीर जाफर जातीच्या म्हशीची दूध उत्पादन क्षमता अत्यंत मोठी आहे. अशी म्हैस 15 ते 16 महिने दूध देण्याची क्षमता ठेवते, त्यामुळे ती शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायदेशीर ठरते. या जातीच्या म्हशी लोकप्रिय आहेत कारण त्यांची ताकद आणि दूध देण्याची क्षमता उत्तम आहे. खंडेराव महाराज यात्रा निमित्त शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत विविध व्यापारी आपल्या जनावरांचा विक्रीसाठी आणतात, ज्यामुळे बाजारात मोठ्या प्रमाणावर उलाढाल होते.