हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उत्तर प्रदेशच्या शहाजहापूरमधील शरद सिंह याच्या घरात सध्या आनंदाचे वातावरण आहे. त्याच्या पत्नीने खासगी रुग्णालयात एका मुलाला जन्म दिला आहे. शरद सिंह, ज्याने दोन वर्षांपूर्वी लिंग बदलाची शस्त्रक्रिया केली होती , त्याला आता बाप होण्याचा मोठा आनंद मिळालेला आहे. शरद हे स्वातंत्र्य सैनिक रोशन सिंह यांचे पणतू आहेत, जे काकोरी कटातील क्रांतिकारी म्हणून प्रसिद्ध होते. शस्त्रक्रिया होण्याआधी त्याचे नाव सरिता सिंह असे होते. पण शस्त्रक्रियेची पूर्ण प्रक्रिया झाल्यानंतर त्यांचे त्याची ओळख अन नाव बदलले .
लिंग बदलाची शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय –
शरद सिंह याने 2021-22 मध्ये लिंग बदलाची शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला होता. जन्मतः मुलगी असलेल्या शरदच्या शारीरिक अन मानसिक स्थितीमध्ये मुलासारखे गुण होते. त्याची आवड-निवड, कपड्यांची शैली, अन हेअरस्टाईल ही मुलांसारखीच होती. या सगळ्यामुळे त्याला ‘जेंडर डिस्फोरिया’चे अनुभव आले होते, ज्यामध्ये त्याला नेहमीच असं वाटत होतं की तो मुलगा आहे. 2022 मध्ये शरदने लखनौमध्ये हार्मोन थेरपी घेतली, ज्यामुळे त्याच्या चेहऱ्यावर दाढी वाढली अन आवाज देखील गडद झाला. 2023 च्या सुरुवातीला शरदने इंदूरमध्ये लिंग बदलाची शस्त्रक्रिया केली. त्यानंतर त्याला एक नवीन ओळख मिळाली आणि शरद सिंह या नावाने तो पुन्हा समाजात उभा राहिला. यानंतर शहाजहांपूरच्या तत्कालीन डीएम उमेश प्रताप सिंह यांनी शरदला पुरुष म्हणून प्रमाणपत्र दिले.
सविता सिंह हिच्याशी विवाह –
हि संपूर्ण प्रक्रिया झाल्यानंतर 23 नोव्हेंबर 2023 रोजी शरद सिंह यांनी सविता सिंह हिच्याशी विवाह केला. 2 एप्रिल 2025 रोजी, सविता सिंह हिच्या प्रसूती वेदनांमुळे तिला एका खासगी रुग्णालयात घेऊन गेले , तिथे ऑपरेशनच्या सहाय्याने तिने एका मुलाला जन्म दिला. या घटनेमुळे शरद सिंहला आयुष्यातील सर्वात मोठा आनंद मिळाला आहे. तसेच तो म्हणतो कि , “माझ्या कुटुंबात 26 वर्षांनी मुलगा झाला आहे. मुलाच्या बाप होण्याचा आनंद प्रत्येक व्यक्तीला मिळावा असं स्वप्न असते , अन आज मी तो अनुभव घेत आहे. ज्या परिस्थितीतून मी बाप बनलो, त्याचं महत्त्व माझ्या आयुष्यात अनमोल आहे.”




