हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । समुद्रकिनारा म्हटलं की, लोकांना भारावून टाकणाऱ्या कोकणाची आठवण होते. कोकणाला 720 किमी चा समुद्र किनारा लाभलेला असून , तेथे अनेक समुद्र आहेत . त्यामुळे बरेच पर्यटक कोकणाला भेट देताना दिसतात. रात्रीच्या अंधारात चमकणारे समुद्र पाहणाऱ्यांची गर्दी प्रचंड आहे. पण असाच अनुभव जर महाराष्ट्रातील समुद्र किनाऱ्यावर मिळत असेल तर लांब जाण्याची गरज नाही . मालवणमध्ये काही वेळा रात्रीच्या वेळेस हे अद्भुत दृश्य पाहायला मिळते. पाण्याच्या लाटांमुळे किंवा एखाद्या व्यक्तीच्या पाण्यात हात घातल्यामुळे पाण्याभोवती निळसर प्रकाश निर्माण होतो, जणू काही समुद्र चमकत आहे. हा अनुभव पर्यटकांसाठी आनंद देणारा क्षण ठरतो . तर आज आपण कोणते समुद्र अंधारात चमकतात हे पाहणार आहोत.
मालवण बायोल्युमिनेसेंटसाठी प्रसिद्ध
अंधारात चमकणाऱ्या समुद्रामध्ये केरळमधील वर्कला समुद्र किनारा ,अंदमान आणि निकोबार येथील हॅवलॉक बेटावरील राधानगरी बीच, गोव्यातील पालोलेम बीच आणि महाराष्ट्रातील मालवणमधील तारकर्ली आणि देवबाग या समुद्रकिनाऱ्यांवर असाच नजारा पाहण्यास मिळतो . रात्रीच्या वेळेस हे समुद्र निळ्या-हिरव्या उजेडाने अगदी पर्यटकांना भारावून टाकतात. रात्री ताऱ्याप्रमाणे चमकणाऱ्या या अद्भूत समुद्रात जणू तारेच अवतरले आहेत असे वाटते. मालवणमध्ये देखील असाच अनुभव मिळतो . हा समुद्र सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असून , सिंधुदुर्गला 120 किमी समुद्र लाभलेला आहे . मालवण समुद्रकिनारा सूर्यास्त आणि बायोल्युमिनेसेंट पाण्यासाठी प्रसिद्ध आहे. येथे रात्रीच्या वेळी अनेक पर्यटक बोटीतून सफर करताना दिसतात.
एक वैज्ञानिक कारण
मालवणातील समुद्रकिनाऱ्यांवर रात्रीच्या वेळी चमकणाऱ्या दृश्याला एक वैज्ञानिक कारण आहे, ते म्हणजे बायोल्युमिनेसेंट फायटोप्लँक्टन . या फायटोप्लँक्टनचे प्रकाश उत्सर्जन हा एक निसर्गाचा चमत्कार आहे, ज्यामुळे रात्रीच्या वेळी समुद्राचे पाणी चमकू लागते. ज्यात काही सूक्ष्मजीव स्वतःहून प्रकाश उत्पन्न करतात. हे सूक्ष्मजीव त्यांच्यातील रासायनिक प्रक्रियेमुळे प्रकाश निर्माण करतात. जेव्हा या जीवांना समुद्राच्या लाटांमुळे किंवा पाण्याच्या हालचालींमुळे त्रास होतो, तेव्हा ते हा प्रकाश उत्सर्जित करतात. ही हालचाल जेव्हा जास्त प्रमाणात होते, तेव्हा अधिक बायोल्युमिनेसन्स तयार होतो, त्यामुळे पाण्याला चमकदार निळसर रंग येतो.
दृश्य कधी पाहण्यास मिळते
- हे दृश्य प्रामुख्याने पावसाळ्यानंतर किंवा काही विशिष्ट हंगामात दिसते. यासाठी योग्य वातावरण आणि पाण्यातील फायटोप्लँक्टनचे प्रमाण महत्त्वाचे असते.
- मालवण आणि इतर कोकणातील किनारे यासाठी प्रसिध्द आहेत. योग्य हंगामात या नैसर्गिक चमत्काराचा आनंद घेणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढत असते .
- बायोल्युमिनेसन्स हे पर्यावरणातील एक अनोखे रसायनिक आणि जैविक प्रक्रिया असून, समुद्राच्या निसर्गसौंदर्यात भर घालताना दिसून येते .