आता हे काय नवीन ? मुंबई ते पुणे केवळ 20 मिनिटांत पोहचता येणार ; विमानापेक्षा सुपरफास्ट ट्रेन

maglev train
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

भारताच्या बाबतीत बोलायचे झाले तर भारतात रेल्वेचे मोठे नेटवर्क आहे. देशभरात लाखो लोक रेल्वेने प्रवास करतात. सध्या देशातील सर्वात वेगवान ट्रेन कोणती ? असा प्रश्न विचारला तर वंदे भारत ट्रेन ही भारतातील सर्वात वेगवान ट्रेन आहे. ही ट्रेन ताशी 180 किमी वेगाने धावू शकते परंतु सध्या ही गाडी ताशी 150 किमी वेगाने चालविली जात आहे. मात्र चिन्यांच्या अजब देशात एक अशी ट्रेन तयार केली गेली आहे जी विमानापेक्षाही वेगवान धावते. चीनने ताशी 1000 किमी वेगाने धावणाऱ्या मॅग्लेव्ह ट्रेनची यशस्वी चाचणी घेतली आहे. जर समजा चीनची ही सुपरफास्ट ट्रेन भारतात आली तर काय होईल ?

या ट्रेनच्या वेगाचा विचार केला तर जर भारतात अशी ट्रेन आली तर मुंबई ते पुणे हे अंतर केवळ 20 मिनिटांत पार होईल. मुंबई ते गोवा एका तासात आणि मुंबई ते नागपूर फक्त दीड तासात पोहचता येईल. बरं आता आपण थोडं स्वप्नरंजन थांबवूया. कारण भारतात अशी ट्रेन आणण्याचा अद्याप तर काही विचार नाही. मात्र चीनच्या या नव्या आविष्काराविषयी चला जाणून घेऊया…

चाके धावत नाहीत तर उडतात

चीनच्या सरकारी मीडियानुसार, या अल्ट्रा-हाय-स्पीड ट्रेनची चाचणी शांक्सी प्रांतात करण्यात आली. ही ट्रेन चायना एरोस्पेस सायन्स अँड इंडस्ट्री कॉर्पोरेशन लिमिटेडने संयुक्तपणे विकसित केली आहे. हे जर्मनीच्या मॅग्लेव्ह म्हणजेच मॅग्नेटिक लेव्हिटेशन तंत्रज्ञानावर चालते. यामध्ये हायस्पीड गाड्यांना चालण्यासाठी ना चाके, ना एक्सल, ना बेअरिंगची गरज असते. पारंपारिक गाड्यांप्रमाणे, मॅग्लेव्ह ट्रेनची चाके रेल्वे ट्रॅकच्या संपर्कात येत नाहीत, उलट ती उडतात. हे त्याच्या वेगाचे कारण आहे.

दोन किलोमीटर लांबीच्या पाइपलाइनमध्ये कमी-व्हॅक्यूम परिस्थितीत या ट्रेनची चाचणी घेण्यात आली. यामध्ये सुपरकंडक्टिंग मॅग्लेव्ह वाहन वापरण्यात आले. या ट्रेनने चाचण्यांमध्ये सर्व मानके पूर्ण केली. चीनच्या यांगगाओ काउंटीमध्ये अल्ट्रा हायस्पीड मॅग्लेव्ह वाहतूक प्रणालीचे बांधकाम एप्रिल 2022 मध्ये सुरू झाले. त्यात एरोस्पेस तंत्रज्ञान आणि रेल्वे तंत्रज्ञान यांचा समावेश करण्यात आला आहे.