इथली पोरं हुश्शार ! एक असं गाव जिथे आहेत 100 पेक्षा जास्त IAS अधिकारी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

भारतात काय नाही ? समृद्ध निसर्ग , विभिन्न संस्कृती , विलोभनीय खाद्य संस्कृती, असं बरच काही सांगता येईल मात्र आजच्या लेखात आम्ही तुम्हाला भारतातल्या एका अशा गावाबद्दल सांगणार आहोत ज्या गावाला “अधिकाऱ्यांचे गाव” म्हंटले जाते. येथे 100 पेक्षा जास्त लोक प्रशासकीय सेवेत काम करतात. चला जाणून घेऊया या अनोख्या गावाची गोष्ट…

मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यातील दुर्गम भागात असलेले आदिवासीबहुल पडियाल गाव “अधिकाऱ्यांचे गाव” म्हणून ओळखले जाते. येथील प्रत्येक मुलाला सिव्हिल सेवक, इंजिनियर किंवा डॉक्टर बनायचे असते. या गावाचे वैशिष्टय म्हणजे हे गाव माळवा भागातील या आदिवासीबहुल क्षेत्र आहे. या गावाची लोकसंख्या जेमतेम 5,000 आहे आणि येथील 100 हून अधिक लोक भारताच्या विविध भागात प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करत आहेत. गावातील सुमारे ९० टक्के लोकसंख्या भिल्ल जमातीची आहे.

साक्षरता दर 90 टक्क्यांहून अधिक

भिल्ल हा एक वांशिक समुदाय आहे जो मध्य प्रदेशातील धार, झाबुआ आणि पश्चिम निमार जिल्ह्यांसह आणि महाराष्ट्रातील धुलिया आणि जळगावसह मध्य भारतीय राज्यांमध्ये राहतो. ते राजस्थानमध्येही आढळतात. मध्य प्रदेश सरकारच्या दाव्यानुसार, पडियाल गावाचा साक्षरता दर 90 टक्क्यांहून अधिक आहे.

मध्य प्रदेश सरकारच्या म्हणण्यानुसार, दोन वर्षांपूर्वीपर्यंत या गावातील प्रशासकीय अधिकाऱ्यांची संख्या 70 होती, जी 2024 मध्ये 100 च्या पुढे जाईल. यामध्ये कनिष्ठ न्यायालयाचे न्यायाधीश, भारतीय पोलीस सेवा अधिकारी, भारतीय प्रशासकीय सेवा अधिकारी, भारतीय अभियांत्रिकी सेवा अधिकारी, डॉक्टर, अभियोजन अधिकारी, वन अधिकारी इत्यादींचा समावेश आहे.

आतापर्यंत 300 सरकारी अधिकारी

राज्य सरकारने एका निवेदनात म्हटले आहे की या गावात एकूण 300 सरकारी अधिकारी आहेत. या गावातील घरटी एक जण सरकारी अधिकारी आहे. स्वातंत्र्य मिळाल्यापासून येथील तरुणांमध्ये स्पर्धा परीक्षांमध्ये सहभागी होण्याची स्पर्धा लागली असल्याचे सांगितले जाते.

या गावाबाबत माहिती देताना या भागात दीर्घकाळापासून ब्लॉक रिसोर्स सेंटर ऑफिसर म्हणून कार्यरत असलेले आणि या विशिष्ट गावातील तरुणांच्या यशोगाथा पाहणारे मनोज दुबे म्हणाले की, गावात शिक्षण देण्यावर अधिक भर देण्यात आला आहे. ते म्हणाले की, शालेय मुले वैद्यकीय आणि अभियांत्रिकीसह प्रशासकीय सेवा, तांत्रिक किंवा इतर क्षेत्रांसाठी त्यांची तयारी सुरू असते.