थेट ठाकरेंवर आरोप ; “8 जानेवारीचं मोबाईल लोकेशन दाखवा”, नितेश राणेंचं ओपन चॅलेंज!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलिवूडचा अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची माजी मॅनेजर दिशा सालियनच्या (Disha Salian) मृत्यू प्रकरणात तिच्या वडिलांनी तब्बल पाच वर्षांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेमध्ये त्यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे मोठे नेते अन माजी मंत्री राहिलेले आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. आणि आता या प्रकरणात नितेश राणेंनी (Nitesh Rane)भूमिका घेत आदित्य ठाकरेंवर जोरदार टीका केली , त्यामध्ये ते म्हणाले कि , आपण त्या दिवशी कुठे होतो? आपलं 8 जानेवारीचं मोबाईल लोकेशन काय होतं? या सगळ्यांची उत्तर त्यांनी द्यावी. नितेश राणे खोटं बोलत आहेत हे त्यांनी सांगावे , हे ओपन चॅलेंज त्यांनी दिले आहे.

नितेश राणे यांनी तात्काळ प्रतिक्रिया –

या याचिकेवर भाजप नेते अन मंत्री नितेश राणे यांनी तात्काळ प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी विधानसभेत सत्ताधारी आमदारांकडून मागणी केली की, संबंधित मंत्र्याला तात्काळ अटक करून त्याची चौकशी केली जावी. राणे यांनी सांगितले की, “सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले आहे की बलात्काराचा आरोप झाल्यास त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करणे आणि चौकशी करणे आवश्यक आहे. दिशाच्या वडिलांनी केलेल्या आरोपानुसार कारवाई झाली पाहिजे.”

नितेश राणे यांनी याविषयी पुढे सांगितले की, “एसआयटीमधील अधिकारी चिमाजी आढाव याने या प्रकरणात मदत केली आहे. आम्ही ज्या व्यक्तीवर संशय व्यक्त करत होतो, त्याच्यासमोर पुरावे देणे कसे शक्य आहे?” तसेच, त्यांनी आरोप केला की एसआयटीला एक पत्र पाठवले होते, ज्यामध्ये ते अधिकारी चौकशीपासून वगळण्याची मागणी करत होते.

त्या व्यक्तींना अटक करण्याची मागणी –

राणे यांनी दिशा सालियनच्या वडिलांनी दिलेल्या तीन नावांवरही तीव्र प्रतिक्रिया दिली. “त्या व्यक्तींना अटक करावी,” अशी मागणी त्यांनी केली. तसेच, “आदित्य ठाकरे हे आमदार आहेत, त्यामुळे ते दबाव आणू शकतात. त्यांना नैतिकतेच्या आधारावर आमदार म्हणून राहू नये,” असेही राणे म्हणाले. “आधी आमचे आरोप राजकीय हेतूने होते, पण आता दिशाच्या वडिलांनी स्पष्ट आरोप केले आहेत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाला का? तिच्या मृतदेहाची फॉरन्सिक तपासणी का केली नाही?”.

मोबाईल लोकेशन आणि त्या दिवशी काय घडले –

नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांना आव्हान दिले आहे की, “ते त्यांच्या मोबाईल लोकेशन अन त्या दिवशी काय घडले याबाबत स्पष्ट उत्तर देतील.” दिशा सालियनच्या मृत्यूप्रकरणी नितेश राणे यांनी केलेले हे आरोप आणि मागण्या प्रकरणाला आणखी गडद करतात, आणि राजकीय वर्तुळात याबाबत अधिक चर्चेला कारणीभूत ठरत आहेत.