Aamir Khan : निवडणुकीच्या प्रचारासाठी आमिर खानच्या व्हिडिओचा गैरवापर; अभिनेत्याने केली FIR दाखल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Aamir Khan) सध्या बॉलीवूडच्या प्रसिद्ध सिनेमंडळींवर काळं सावट आलंय का काय? असंच काहीसं वाटू लागलं आहे. नुकतेच अभिनेता सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरण समोर आले. या प्रकरणी भाईजानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या २ आरोपींना पोलिसांनी अटकदेखील केली. त्यांना गुजरातमधून ताब्यात घेण्यात आले. सोशल मीडियावर या प्रकरणाची तुफान चर्चा रंगली असतानाच दुसरीकडे आमिर खानसोबत देखील एक धक्कादायक प्रकार घडला आहे. ज्यासाठी त्याला पोलिसांची मदत घ्यावी लागली आहे.

गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक सेलिब्रिटी मंडळी डीपफेक व्हिडिओचे शिकार झाल्याचे दिसले. यातच आता (Aamir Khan) आमिर खानसोबत देखील असाच काहीसा प्रकार घडल्याचे समजत आहे. या प्रकरणी आमिर खान याने तडक वेळ न घालवता पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर नोंदवल्याची माहिती समोर आली आहे.

नेमकं काय झालंय?

सध्या सर्वत्र लोकसभा निवडणुकीची चर्चा आहे. अशातच एका राजकीय पक्षाचा प्रचार करण्यासाठी आमिर खानचा एक व्हिडिओ चुकीच्या पद्धतीने वापरण्यात आल्याची घटना समोर आली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून हा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला आहे. ज्यामध्ये (Aamir Khan) आमिर खानचा एक जुना व्हिडिओ वापरला गेलाय. ज्यातून एका राजकीय पक्षाचा खोटा प्रचार केला जातोय. खरंतर व्हिडिओचा विषय वेगळा आहे. मात्र, व्हिडिओसोबत जोडलेले कॅप्शन हे राजकीय पक्षाचा प्रचार करणारे आहे.

व्हायरल व्हिडिओ

सोशल मीडिया एक्स हॅण्डलवर हा व्हिडिओ बऱ्याच वेळापासून व्हायरल होतो आहे. ज्यात स्पष्टपणे अभिनेता आमिर खान (Aamir Khan) दिसून येतोय. इतकेच नव्हे तर या व्हिडिओतील आवाज देखील आमिरचा असल्याचे भासत आहे. जो डब करण्यात आला आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अभिनेत्याने थेट याप्रकरणी ॲक्शन घेत पोलिसांची मदत घेतली आहे. मात्र अजूनही सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होत असल्याचे दिसत आहे.

आमिर खान आणि टीमने नोंदवली FIR

मिळालेल्या माहितीनुसार, सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होताच (Aamir Khan) आमिर आणि त्याच्या टीमने या संदर्भात एक महत्त्वाचा निर्णय घेतला. त्यानंतर थेट पोलीस स्टेशनमध्ये FIR नोंदवण्यात आली. आमिर खानने याविषयी अधिकृतपणे जाहीर केले आहे की, आजपर्यंत त्याने कोणत्याही पक्षाचा कशाही प्रकारे प्रचार केलेला नाही आणि हा व्हिडिओ पूर्णपणे फेक असून यावर लोकांनी विश्वास ठेवू नये असे त्याने आवाहन केले आहे’.

आमिर खान झाला डीपफेक व्हिडिओचा शिकार (Aamir Khan)

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडिओ डीपफेक असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी अभिनेत्याने पोलीस स्टेशनमध्ये FIR देखील नोंदवली आहे. सोबतच अधिकृत विधान करत म्हटलंय, ‘माझ्या ३५ वर्षांच्या कारकिर्दीत मी कोणत्याही राजकीय पक्षाचा प्रचार केलेला नाही’. त्याचे हे स्पष्ट विधान समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.

या व्हिडिओप्रकरणी मुंबई पोलिसांच्या सायबर सेलकडे तक्रार नोंदवण्यात आली आहे. आता पोलीस काय कारवाई करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. (Aamir Khan) याआधी देखील अनेक सेलिब्रिटी असेच डीपफेक व्हिडीओचे शिकार झाले आहेत. यात आता आमिर खानच्या नावाचा देखील समावेश झाला आहे.