Aamir Khan Son : आमिर खानचा लेक जुनैदच्या पहिल्या सिनेमाची Netflix कडून अधिकृत घोषणा; फर्स्ट लूक रिलीज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Aamir Khan Son) बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अर्थात अभिनेता आमिर खान हा कायम वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असतो. अलीकडेच त्याच्या मुलीचं म्हणजेच आयरा खानचं तिचा बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसोबत लग्न पार पडलं. यानंतर आता आमिर खानचा मुलगा जुनैद खान बॉलिवूड सिनेविश्वात फर्स्ट डेब्यू करतोय. गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्या पदार्पणाची चर्चा होती. अखेर आता जुनैदचा पहिला चित्रपट ‘महाराजा’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे समजत आहे.

फर्स्ट लूक रिलीज

जुनैद खानच्या ‘महाराजा’ सिनेमाचा फर्स्ट लूक नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. या सिनेमाचे कथानक एका ऐतिहासिक महाकाव्यावर बेतलेले आहे. (Aamir Khan Son) माहितीनुसार, या चित्रपटात आमिर खानचा मुलगा जुनैद खान हा एका पत्रकाराची भूमिका साकारताना दिसणार आहे. हा त्याचा पहिलाच सिनेमा असून त्याने पहिल्याच प्रोजेक्टमध्ये अत्यंत आव्हानात्मक भूमिका स्वीकारली आहे. चित्रपटाच्या फर्स्ट लूकमध्ये जुनैदची भूमिका आणि त्याच्या लूकची झलक दाखवलेली नाही. शिवाय त्याच्या भूमिकेबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

Maharaj, Mandala Murders, Vijay 69 | Official Announcement | YRF | Netflix India

जुनैदसोबत झळकणार ‘हे’ कलाकार

आमिर खान प्रोडक्शन या बॅनरखाली जुनैदच्या ‘महाराजा’ या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच ‘महाराजा’ चित्रपटाच्या सेटवरील जुनैदचे काही फोटो व्हायरल झाले होते. (Aamir Khan Son) ज्यामुळे त्याच्या भूमिकेविषयी उत्सुकता वाढली होती. माहितीनुसार, या चित्रपटात जुनैदबरोबर अभिनेत्री साई पल्लवी, शालिनी पांडे, शरवरी वाघ आणि जयदीप अहलावत या कलाकारांच्या मुख्य भूमिका असणार आहेत.

जुनैदच्या कारकिर्दीतील पहिले आव्हान (Aamir Khan Son)

जुनैदने बॉलीवूडमध्ये येण्याआधी जवळपास ७ वर्षे रंगभूमीवर अभिनयाचे धडे गिरवले आहेत. यानंतर त्याने आमिर खान प्रॉडक्शन निर्मित ‘प्रीतम प्यारे’ या वेब सीरिजमध्येसुद्धा अभिनय करून अनुभव घेतला आहे. इतकेच नव्हे तर त्याने ‘लाल सिंह चड्ढा’च्या मुख्य भूमिकेसाठीदेखील ऑडिशन दिली होती.

माहितीनुसार, ‘महाराजा’ सिनेमानंतर जुनैद ‘लव्ह टुडे’ या साऊथ चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्ये झळकणार आहे. (Aamir Khan Son) जुनैदच्या अभिनय क्षेत्रातील कारकिर्दीतील या पहिल्या आव्हानांसाठी तो सज्ज असून त्याच्या भूमिकेबाबत प्रेक्षक उत्सुक झाले आहेत.