हृदयद्रावक ! पुणे-बंगळूर महामार्गावर भीषण अपघात ; 24 वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू

satara news
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

रविवार दिनांक 12 जानेवारी रोजी एक हृदयद्रावक घटना पुणे – बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील निरा नदीच्या पुलाजवळ शिंदेवाडी येथे घडली. या घटनेमध्ये 24 वर्षे तरुणीचा जागीच मृत्यू झाल्याने सर्वत्र या घटनेबाबत हळहळ व्यक्त केली जात आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील नामांकित आयटी कंपनीत कार्यरत असणारे तीन तरुण आणि एक तरुणी हे महाबळेश्वरला फिरण्यासाठी दुचाकीवरून( एम एच ०१ डीजे ८३६५ ) निघाले होते. मात्र अचानक खंडाळा तालुक्यातील शिंदेवाडी गावाजवळ नीरा नदी पुलावर हे सर्वजण आले असता एका भरधाव ट्रकने ( पिबी 06 ए यु 9995 ) त्यांच्यातील एका दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जाबसादस्त होती की मागे बसलेली रुबेल सिन्हा नावाची 24 वर्षीय तरुणी रस्त्यावर पडली. आणि काही कळण्याच्या आताच मागवून येणारा ट्रक तिच्या अंगावरून गेला त्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला. या घटनेतील दुचाकी चालवणारा तरुण गंभीर जखमी असून त्याला शिरवळ येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान या घटनेची माहिती मिळतात शिरवळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप जगताप, विलास यादव, पोलीस हवालदार अरविंद बाराळे आणि भाऊसाहेब देखे यांनी घटनास्थळी धाव घेतली. ही घटना घडताच या ठिकाणी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. त्यानंतर या महामार्गावरील वाहतूक कोंडी सुरळीत करण्यात आली. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुबेल सीन्हा ही अवघ्या 24 वर्षाची तरुणी या अपघातामध्ये मृत्यू पावल्यामुळे तिच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून अवघ्या महाराष्ट्र भरात या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे.