गड कायम राखला ! आदित्य ठाकरे यांचा विजय ; शिंदे आणि राज ठाकरेंच्या माणसाचा केला पराभव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 चे निकाल आता जवळपास स्पष्ट झाले आहेत. राज्यातील काही ठराविक मतदारसंघाचे निकाल अद्याप बाकी आहेत मात्र एकूणच जे चित्र दिसत आहे ते महायुतीच्या बाजूला झुकलेला दिसत आहे. कारण महायुतीला यंदाच्या विधानसभा निवडणुकांमध्ये घवघवीत यश मिळालेला आहे. आज दुपारी दोन वाजून 45 मिनिटांनी मिळालेल्या आकडेवारीनुसार 225 जागांवर महायुती आघाडीवर आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीला केवळ 50 जागांवर यश मिळाल्याचे दिसते आहे. तर इतर पक्षांना 13 जागा मिळालेल्या आहेत.

उद्धव ठाकरे गटाला अपयश मिळताना दिसत आहे. मात्र उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे यांनी मात्र आपला बालेकिल्ला शाबूत ठेवलाय. महायुतीचं सरकार येणार हे जवळपास स्पष्ट असलं तरी उद्धव ठाकरेंच्या चिरंजीवांनी आदित्य ठाकरे यांनी आपला वरळीचा गड कायम राखलाय. त्यांनी शिंदे गटाचे मिलिंद देवरा आणि मनसेचे उमेदवार संदीप देशपांडे यांचा पराभव केला आहे.

वरळी विधानसभा मतदारसंघाची हीच जागा अत्यंत प्रतिष्ठेची मानली जात होती. एकीकडे यंदाच्या वर्षीच्या निवडणुकांमध्ये सत्ता समीकरणे बदलली असताना मोठ्या उलथापालती झाल्या असताना उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे यांचं काय होणार? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलं होतं शिवाय मनसेने देखील संदीप देशपांडे यांच्या रूपानं इथं दमदार उमेदवार उभा केला होता. तर दुसरीकडे शिवसेनेच्या शिंदे गटांकडून मिलिंद देवरा यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र या सगळ्यांमध्ये आदित्य ठाकरे यांनी आपला गड राखला असून वरळी मतदारसंघात आपलं वर्चस्व कायम ठेवले आहे. वरळी मतदारसंघातून आदित्य ठाकरे यांनी 8000 मतांनी विजय मिळवला असून वरळीत तिहेरी लढत रंगली होती पण वरळी येथे शिंदे गट आणि मनसेला धूळ चारत आदित्य ठाकरे यांनी विजय खेचून आणला आहे.

एका भावाचा विजय आणि दुसऱ्याचा पराजय

दरम्यान आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे हे चुलत भाऊ यंदा निवडणुकीच्या रिंगणात होते. यातील एका भावाला विजय तर दुसऱ्या भावाला पराजयाचा सामना करावा लागला आहे. माहीमी मतदारसंघाच्या निकालाकडं अवघ्या मुंबईचा लक्ष लागलं होतं. माहीम मतदारसंघातून धक्कादायक निकाल आला असून पहिल्यांदाच निवडणुकीला उभे राहिलेले राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांचा पराभव झाला आहे. विशेष म्हणजे अमित ठाकरे यांच्यासाठी शिंदे गटाचे आमदार सदा सर्वणकर यांनी अर्ज मागे घ्यावा अशी विनंती केली होती पण सरवणकर निवडणूक लढण्यावर ठाम होते. त्यामुळे ही निवडणूक सरवण कर विरुद्ध अमित ठाकरे होईल असा अंदाज होता मात्र या ठिकाणी महेश सावंत यांनी बाजी मारली.