जय भोलेनाथ !! तब्बल 5 वर्षांनी कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू ; यात्रेकरूंना मोठी खुशखबर

0
3
Kailash Mansarovar Yatra
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारत आणि चीन यांच्यातील 5 वर्षांच्या विरामानंतर, कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू होणार आहे. भारत-चीन दरम्यान थेट विमानसेवा देखील सुरू होणार असून, याबाबत निर्णय परराष्ट्र सचिवांच्या बैठकीत घेण्यात आला. जून 2020 मध्ये डोकलाम वादानंतर यात्रा थांबवण्यात आली होती, मात्र आता भारत-चीन परराष्ट्र सचिवांच्या दोन दिवसांच्या चर्चेनंतर यात्रा सुरू करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. त्यामुळे अनके यात्रेकरूंना मोठा दिलासा मिळाला आहे. तर चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

विमानसेवा देखील पुन्हा सुरू –

कोविड-19 मुळे बंद असलेल्या विमानसेवा देखील पुन्हा सुरू होणार आहेत. कैलास मानसरोवर यात्रा, जी हिंदू धर्मीयांसाठी अत्यंत पवित्र मानली जाते, आता यंदा ती सुरू होत आहे. कैलास पर्वत, जो तिबेटमध्ये स्थित आहे, तसेच तो हिंदू आणि जैन धर्मीयांसाठी विशेष धार्मिक महत्त्व राखतो. कैलास पर्वतावर चढाई अत्यंत कठीण असून, आजतागायत कोणालाही त्यावर चढता आलेले नाही. यामध्ये पवित्र मानसरोवर तलाव देखील आहे, जो यात्रा करणाऱ्यांसाठी एक दिव्य अनुभव ठरतो. त्यामुळे तब्बल पाच वर्षांनी सुरु होणारी यात्रा यात्रेकरूंना आनंद देणार आहे.

वेबसाइटवर ऑनलाइन रजिस्ट्रेशन –

कैलास मानसरोवर यात्रा करण्यासाठी इच्छुक पर्यटकांना परराष्ट्र मंत्रालयाच्या वेबसाइटवर ऑनलाइन रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे. यात्रा पूर्ण करण्यासाठी अंदाजे 25 दिवसांचा कालावधी लागतो. यासाठी पासपोर्ट साइज फोटो, पासपोर्टच्या पहिल्या आणि शेवटच्या पानाचे फोटो, फोन नंबर, ईमेल तसेच फिटनेस सर्टिफिकेट तसेच इतर कागदपत्रे आवश्यक आहे. तसेच, या यात्रेचा खर्च 1.5 ते 3 लाख रुपये दरम्यान असू शकतो.