हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगामध्ये पहिल्यांदाच पूर्णपणे आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) द्वारा डिझाइन केलेला बूट लाँच करण्यात आला आहे. रीबॉकचे (Reebok) सह-संस्थापक जो फॉस्टर आणि उद्योजक बेन वीस यांनी मिळून Syntilay नावाचा हा बूट बाजारात आणला आहे. हे एक अत्याधुनिक स्लाइड असून, ज्यामध्ये AI तंत्रज्ञान आणि 3D प्रिंटिंगचा उत्कृष्ट वापर करण्यात आला आहे. यामुळे त्यातील अनोखे डिझाइन आणि परफेक्ट फिटिंग दिली आहे. तर चला या AI च्या नवीन अविष्काराबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
AI द्वारा Syntilay बूट डिझाइन –
Syntilay या बुटाचे अंदाजे 70 % डिझाइन AI ने तयार केले आहे. या बूटाच्या डिझाइनसाठी AI ने अनेक यॉट ब्रिज (yacht bridge) आणि सायन्स फिक्शन आर्टिस्ट सिड मीड (Syd Mead) यांच्या डिझाइन्सपासून प्रेरणा घेतली आहे. आणि नंतर हा बूट तीन टप्प्यांमध्ये तयार करण्यात आलेला आहे. त्यात AI ने डिझाइन कॉन्सेप्ट तयार केले. नंतर मानवी डिझाइनर्सनी AI च्या मदतीने स्केच काढले . आणि या सगळ्यानंतर आर्टिफिशियल इंटेलिजन्सने त्या स्केचेसला अंतिम 3D मॉडेलमध्ये रूपांतरित केले.
Syntilay च्या प्रत्येक जोड्याचे उत्पादन –
Syntilay च्या प्रत्येक जोड्याचे उत्पादन जर्मनीमध्ये 3D प्रिंटिंगद्वारे केले जाईल आणि उत्पादन व शिपिंगला 4 ते 6 आठवड्यांचा वेळ लागेल. रीबॉकचे सह-संस्थापक जो फॉस्टर म्हणाले की, Syntilay च्या मदतीने फुटवियर उद्योगात नवीन तंत्रज्ञान आणि बदल स्वीकारण्याची संधी मिळेल. AI तंत्रज्ञानाने बनवलेला हा बूट फुटवियर उद्योगात एक नवीन अध्याय जोडतो. त्याच्या एक्सक्लूसिव्ह डिझायनिंग, कस्टम फिटिंग आणि 3D प्रिंटिंग तंत्रज्ञानामुळे तो खास बनतो. भविष्यात ही तंत्रज्ञान फुटवियर आणि फॅशन उद्योगात मोठे बदल घडवू शकते.
फक्त काही हजार जोड्यांमध्येच उपलब्ध –
Syntilay सुरुवातीला फक्त काही हजार जोड्यांमध्येच उपलब्ध होईल, ज्यामुळे तो एक एक्सक्लूसिव्ह आणि उच्च-स्तरीय उत्पादन बनेल. कंपनीची योजना भविष्यात AI-जनरेटेड गियर सेलिब्रिटीज, इन्फ्लुएन्सर्स आणि सामान्य ग्राहकांसाठी डिझाइन करण्याची आहे.
बूटाची किंमत आणि रंग –
या बूटाची किंमत $149.99 (सुमारे 12,500 रुपये) आहे. Syntilay बूट काळ्या (ब्लॅक), निळ्या (ब्लू) , ओट, नारंगी (ऑरेंज) आणि लाल (रेड ) अशा पाच रंगांमध्ये लाँच केला आहे. हा बूट कस्टम-फिटेड करण्यासाठी एक खास स्मार्टफोन स्कॅनिंग अॅप वापरले जाते, ज्यामुळे प्रत्येक व्यक्तीच्या पायांचे योग्य माप घेतले जाते.