AI Effect On Jobs : नोकरदारांसाठी AIचा फटका ; विविध क्षेत्रातील 2 लाख नोकऱ्या धोक्यात ?

AI Effect On Jobs
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । AI Effect On Jobs – जे लोक नोकरी करत आहेत त्यांच्यासाठी हि बातमी महत्वाची ठरणार आहे. ब्लुमबर्ग इंटेलिजन्सने आपला एक अहवाल सादर केला असून , यात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) वाढत्या वापरामुळे आगामी 3 ते 5 वर्षांत जागतिक बँकिंग क्षेत्रातील अंदाजे 2 लाख नोकऱ्या संपणार असल्याचे सांगितले आहे . या बदलामुळे कर्मचारी संख्येत सरासरी 3% घट होण्याची शक्यता आहे. ब्लुमबर्ग इंटेलिजन्सचे वरिष्ठ संशोधक आणि अहवालाचे लेखक तोमाज नोएटजेल यांनी याबाबत माहिती दिली आहे. तर चला (AI Effect On Jobs) या बातमीबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

AI चा परिणाम (AI Effect On Jobs) –

Artificial intelligence मुळे प्रामुख्याने बँक ऑफिस, मिडल ऑफिस आणि ऑपरेशन्स यांसारख्या विभागातील नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम होईल. नियमित व पुनरावृत्तीच्या कामांचा ताबा AI वर चालणाऱ्या यंत्रणा घेऊ शकतात. उदाहरणार्थ, डेटा एन्ट्री, कागदपत्रांचे विश्लेषण, क्रेडिट रेटिंग्सचे मूल्यांकन इत्यादी कामे एआयच्या सहाय्याने सुलभ होऊ शकतात. परिणामी, अशा नोकऱ्यांची गरज कमी होईल आणि कर्मचारी कमी केले जातील.

AI मुळे नोकऱ्या पूर्णपणे संपणार नाहीत –

नोएटजेल यांनी स्पष्ट केले की, ‘एआय’मुळे (AI Effect On Jobs) नोकऱ्या पूर्णपणे संपणार नाहीत. पण बँकिंग क्षेत्रातील श्रमशक्तीत (नोकऱ्यांमध्ये ) मोठे बदल घडू शकतात. एआयमुळे त्याचवेळी बँकिंग क्षेत्रातील सुरक्षा यंत्रणा आणि धोरणे अधिक मजबूत होऊ शकतात. बँकिंग क्षेत्रात कमीत कमी श्रमशक्तीचा वापर किंवा मानवी नियंत्रणाशिवाय यंत्र व तंत्र यांच्या साह्याने उत्पादन प्रणाली राबविण्याची प्रक्रिया अधिक चांगली होईल. ज्यामुळे बँकांना अधिक सुरक्षित व प्रभावी सेवा प्रदान करता येतील.

कामाच्या स्वरूपात बदल आवश्यक –

ग्राहक सेवा क्षेत्रातील काही कामे आणि तांत्रिक दुरुस्त्या देखील ‘एआय’च्या (AI Effect On Jobs) सहाय्याने केली जाऊ शकतात, ज्यामुळे कामाच्या स्वरूपात बदल होईल. बँकिंग क्षेत्रात ‘एआय’चा वापर वाढत असतानाच, कर्मचार्यांना नव्या कौशल्यांमध्ये प्रशिक्षण देण्याची आवश्यकता असेल, ज्यामुळे ते बदलत्या नोकरीच्या परिस्थितीला सामोरे जाऊ शकतील.

हे पण वाचा : राज्यात पर्यटन सल्लागार समिती स्थापन करण्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांचे निर्देश