Airtel चा दमदार प्लॅन ! फक्त एकदाच रिचार्ज करा आणि 365 दिवस मोबाईल टेन्शनमुक्त वापरा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Airtel Recharge : दुसऱ्या क्रमांकाची मोठी टेलिकॉम कंपनी भारती एअरटेलने आपल्या ३६ कोटी युजर्ससाठी एक जबरदस्त जुगाड तयार केला आहे. आता दर महिन्याला रिचार्ज करण्याची झंझट नाही, कारण एअरटेलने ३६५ दिवस वैधतेचे खास प्रीपेड प्लॅन्स सादर केले आहेत तेही अतिशय किफायतशीर दरात.

₹२२४९ चा प्लॅन ( Airtel Recharge )

एअरटेलचा ₹2249 चा प्लॅन त्या युजर्ससाठी आहे ज्यांना वर्षभर फोन चालू ठेवायचा आहे आणि कॉलिंगसह डेटा वापरण्याची गरज आहे.
या प्लॅनमध्ये मिळतात:

  • ३६५ दिवसांची वैधता
  • अनलिमिटेड कॉलिंग – भारतभर कुठेही
  • दिवसाला १०० मोफत SMS
  • एकूण ३०GB हाय-स्पीड डेटा – यामध्ये कोणतीही डेली लिमिट नाही
  • Airtel XStream Play आणि Hello Tunes चे मोफत सब्स्क्रिप्शन

₹१८४९ चा सर्वात स्वस्त वार्षिक प्लॅन

एकदाच रिचार्ज करा आणि वर्षभर कॉलिंग आणि इंटरनेटसाठी टेन्शन विसरून जा . अशा पद्धतीचा ₹१८४९ चा सर्वात स्वस्त वार्षिक प्लॅन फीचर फोन युजर्ससाठी खास आहे. जर तुम्ही स्मार्टफोन नव्हे तर 2G फीचर फोन वापरत असाल, तर एअरटेलचा ₹1849 चा प्लॅन तुमच्यासाठी परफेक्ट आहे.

या प्लॅनमध्ये काय मिळते

  • ३६५ दिवसांची वैधता
  • अनलिमिटेड कॉलिंग भारतभर कुठेही
  • फ्री नेशनल रोमिंग
  • एकूण ३६०० मोफत SMS (दिवसाला १० SMS च्या दराने)
  • डेटा समाविष्ट नाही – हवे असल्यास ऐड-ऑन घ्या

TRAI च्या मार्गदर्शनानुसार लॉन्च झालेला हा प्लॅन जास्त डेटा न वापरणाऱ्या युजर्ससाठी सर्वोत्तम पर्याय आहे.एअरटेलने वर्षभर चालणारे हे प्लॅन्स सादर करून आपल्या युजर्सना मोठा दिलासा दिला आहे. वारंवार रिचार्ज करण्याचा त्रास टाळा, आणि एकदाच स्मार्ट प्लॅन निवडून १२ महिन्यांची चिंता विसरा. विशेषतः ग्रामीण, फीचर फोन युजर्ससाठी ₹1849 चा प्लॅन अत्यंत उपयुक्त आहे, तर स्मार्टफोन युजर्ससाठी ₹2249 चा प्लॅन फायदेशीर ठरेल.