ऑपरेशन सिंदूरनंतर देशात हाय अलर्ट! 27 विमानतळ बंद, 430 उड्डाणे रद्द

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Airport closed list: पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ हवाई कारवाईनंतर देशभरात उच्च सतर्कता जारी करण्यात आली आहे. परिणामी देशातील २७ विमानतळ तात्पुरते बंद ठेवण्यात आले असून ४३० हून अधिक उड्डाणे गुरुवारी (८ मे) रद्द करण्यात आली आहेत. देशाच्या अंतर्गत सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर हे पाऊल उचलण्यात (Airport closed list) आले आहे.

ही २७ प्रमुख विमानतळं तात्पुरती बंद (Airport closed list)

भारत सरकारने घेतलेल्या तातडीच्या निर्णयामुळे खालील २७ विमानतळ १० मे, शनिवारी सकाळी ५:२९ वाजेपर्यंत बंद राहणार आहेत यामध्ये चंदीगड, श्रीनगर, अमृतसर, लुधियाना, भुंतर, किशनगड, पटियाला, शिमला, गग्गल, भटिंडा, जैसलमेर, जोधपूर, बीकानेर, हलवारा, पठाणकोट, लेह, जम्मू, मुंद्रा, जामनगर, राजकोट, पोरबंदर, कांडला, केशोद, भुज, धर्मशाळा, ग्वाल्हेर आणि हिंडन (गाझियाबाद) विमानतळांचा समावेश आहे.

विमानतळांवर सुरक्षाव्यवस्था वाढवली (Airport closed list)

दिल्ली, मुंबई, बेंगळुरू, चेन्नई आणि हैदराबाद यांसारख्या प्रमुख आंतरराष्ट्रीय विमानतळांवर सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. सीआयएसएफच्या विशेष टुकड्या तैनात करण्यात आल्या असून प्रत्येक प्रवाशाचे बारकाईने तपासणी केली जात आहे.

४३० उड्डाणे रद्द

गुरुवारी देशातील विविध विमान कंपन्यांनी ४३० उड्डाणे रद्द केली आहेत, जे एकूण नियोजित उड्डाणांच्या सुमारे ३ टक्के आहे. यामुळे हजारो प्रवाशांना शेवटच्या क्षणी प्रवास बदलावा लागला आहे.

प्रवाशांसाठी सल्ला (Airport closed list)

सर्व विमानतळ प्रशासनांनी प्रवाशांना सल्ला दिला आहे की, अत्यावश्यक नसल्यास प्रवास टाळावा. ज्या प्रवाशांच्या फ्लाइट्स रद्द किंवा पुनर्नियोजित (rescheduled) झाल्या आहेत, त्यांनी संबंधित विमान कंपनीच्या ग्राहक सेवा केंद्राशी संपर्क साधावा. काही कंपन्या पूर्ण परतावा (refund) तर काहीजण फ्री रिबुकिंगची सुविधा देत आहेत.

ही स्थिती का निर्माण झाली?

भारतीय सैन्याने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तानमधील दहशतवादी प्रशिक्षण केंद्रांवर हवाई हल्ले केल्यानंतर पाकिस्तानकडून संभाव्य पलटवाराच्या भीतीने भारत सरकारने तात्काळ संरक्षणात्मक उपाययोजना म्हणून ही पावलं उचलली आहेत.