हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । क्रिकेट प्रेमींना केंद्रस्थानी ठेऊन भारतीय एअरटेल (Airtel ) अन व्होडाफोन आयडिया (VI) ने धमाकेदार रिचार्ज प्लॅन जारी केले आहेत. यामुळे यंदाच्या इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2025 स्पर्धा पाहण्यासाठी ग्राहकांना जास्त आनंद मिळणार आहे. हे नवीन आणि आकर्षक प्रीपेड रिचार्ज प्लॅन्स दोन्ही कंपन्यांनी ॲड-ऑन पॅक म्हणून सादर केले आहेत. ज्यामुळे ग्राहकांना या प्लॅनवर रिचार्ज करून JioHotstar चे मोफत सब्स्क्रिप्शन (Subscription) मिळणार आहे. यामुळे स्पर्धा पाहण्याचा आनंद द्विगुणी होतो. तर चला या प्रीपेड रिचार्ज प्लॅन्सबदल अधिक माहिती जाणून घेऊयात.
Airtel चे JioHotstar प्लॅन्स –
एअरटेलने JioHotstar च्या मोफत सब्स्क्रिप्शनसह दोन नवीन क्रिकेट पॅक लाँच केले आहेत. यामध्ये पहिला प्लॅन 100 रुपयांचा असणार आहे. या पॅकमध्ये 5 जीबी डेटा आणि 30 दिवसांचा जीओहॉटस्टार अॅक्सेस मिळतो. तसेच याची व्हॅलिडिटी 30 दिवसांची आहे. त्यामुळे ग्राहकांना अतिरिक्त फायदा मिळणार आहे. तसेच दुसरा प्लॅन ग्राहकांना 195 रुपयांना उपलब्ध होणार आहे. ज्याची व्हॅलिडिटी 90 दिवसांची असणार आहे. यात 15 जीबी डेटा आणि 90 दिवसांचा जीओहॉटस्टार सब्स्क्रिप्शन मिळते. हे पॅक डेटा व्हाउचर्स आहेत, ज्यामध्ये कॉलिंग सेवा उपलब्ध नाहीत. यासाठी ग्राहकांना सक्रिय बेस प्लॅन असावा लागेल.
VI JioHotstar प्लॅन्स –
व्होडाफोन आयडियाने आपल्या ग्राहकांसाठी काही आकर्षक पॅक सादर केले आहेत, ज्यामध्ये JioHotstar सब्स्क्रिप्शन देखील समाविष्ट आहे. यामध्ये 101 रुपयांचा डेटा व्हाउचर आहे, जो IPL 2025 पाहण्याचा सर्वात स्वस्त पर्याय आहे. या व्हाउचरमध्ये 5 जीबी डेटा आणि 3 महिन्यांचं JioHotstar सब्स्क्रिप्शन मिळते, ज्याची व्हॅलिडिटी 30 दिवसांची आहे. याशिवाय, 239 रुपयांच्या पॅकमध्ये अमर्यादित कॉलिंग, 2 जीबी डेटा, 300 एसएमएस आणि 28 दिवसांचे JioHotstar सब्स्क्रिप्शन मिळते . 399 रुपयांच्या पॅकमध्ये रोज 2 जीबी डेटा, दररोज 100 एसएमएस, अमर्यादित कॉलिंग आणि 28 दिवसांचा JioHotstar सब्स्क्रिप्शन उपलब्ध आहे. याशिवाय, 239 आणि 399 रुपयांच्या स्टँडअलोन पॅकसाठी बेस प्लॅनची आवश्यकता नाही. या नवीन पॅकसह क्रिकेट चाहत्यांना IPL 2025 चे सामने 4K मध्ये पाहण्याचा एक उत्कृष्ट अनुभव मिळेल, ज्यामुळे हे पॅक खास आकर्षक ठरतात.