हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Akshaya Tritiya 2024) उद्या साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जाणारा अक्षय्य तृतीया हा सण आहे. जो वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तिसऱ्या दिवशी येतो. या दिवशी सोने खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. मान्यतेनुसार, या शुभ दिनी सोने खरेदी केल्याने घरात समृद्धी आणि सौभाग्य येते. परंतु गेल्या काही काळात सोन्याचे दर आभाळाला टेकले आहेत. त्यामुळे सोने खरेदी करण्याचा नुसता विचार देखील त्रास देतो. अशा परिस्थितीत, तुम्ही डिजिटल सोने खरेदी करू शकता. आता ते कसे? हा विचार करू नका. तर ही बातमी पूर्ण वाचा आणि स्टेप बाय स्टेप फॉलो करा.
डिजिटल सोने म्हणजे काय? (Akshaya Tritiya 2024)
‘डिजिटल सोने’ अर्थात ‘डिजिटल गोल्ड’ म्हणजे काय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर ही एक ऑनलाइन सोने खरेदी करण्याची आधुनिक प्रक्रिया आहे. जिच्या माध्यमातून वापरकर्ते ऑनलाइन सोने खरेदी करू शकतात. डिजिटल सोने खरेदी करण्याची सुविधा डिजिटल प्लॅटफॉर्मवर सुरुवातीला केवळ १ रुपयांच्या किमतीसह उपलब्ध आहे. त्यामुळे महागाईच्या काळात डिजिटल सोने खरेदी करणे सहज शक्य आहे.
Google Pay आणि Paytm वरून डिजिटल सोने खरेदी करता येईल का?
नक्कीच. जर तुम्ही Google Pay आणि Paytm चा वापर करत असाल तर केवळ डिजिटल पेमेंटसाठी नव्हे तर डिजिटल सोने खरेदीसाठी देखील याचा वापर करू शकता. ते कसे हे जाणून घेऊया.
Google Pay च्या माध्यमातून ‘असे’ खरेदी करा डिजिटल सोने
1. सगळ्यात आधी फोनमध्ये Google Pay ॲप उघडा. (Akshaya Tritiya 2024)
2. ‘गोल्ड लॉकर सर्च करा आणि त्यावर क्लिक करा.
3. स्क्रीनवर दिसणाऱ्या ‘Buy’ या पर्यायावर क्लिक करा.
4. आता तुम्हाला करासह सोन्याची वर्तमान किंमत दर्शविली जाईल.
Paytm च्या माध्यमातून ‘असे’ खरेदी करा डिजिटल सोने (Akshaya Tritiya 2024)
1. सगळ्यात आधी पेटीएम ॲप उघडा.
2. आता ‘सर्व सेवा’ विभागात जा.
3. ‘गोल्ड’ ऑप्शन सर्च करा आणि त्यावर क्लिक करा.
4. ‘Buy in Grams’ किंवा ‘By in Amount’ पैकी एक पर्यायाची निवड करा.
5. जर तुम्ही रकमेत खरेदी करताय तर रक्कम प्रविष्ट करा आणि ‘पुढे जा’ क्लिप करा. (Akshaya Tritiya 2024)
6. यानंतर पेमेंट ऑप्शन येतील त्यापैकी एकाची निवड करा.