Alaskapox Virus : कोरोनानंतर आता अलास्कापॉक्स व्हायरसचे थैमान; मांजरामुळे पसरतोय विषाणू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Alaskapox Virus) संपूर्ण जगभराने कोरोनाच्या महामारीचा भीषण काळ पाहिला आहे. त्यामुळे आता नुसतं व्हायरसविषयी चर्चा करायचं म्हटलं तरीही प्रत्येकाला घाम फुटतो. कोरोनाचा हाहाकार भले थांबला असेल तर जनमानसात विषाणूविषयी बसलेली भीती काही केल्या जाईना. अशातच कोरोना व्हायरसनंतर आता आणखी एक नवा व्हायरस वेगाने पसरतो आहे. ज्याचे नाव ‘अलास्कापॉक्स’ असे आहे.

अत्यंत दुर्मिळ अशा या विषाणूमुळे एका रुग्णाचा मृत्यू झाल्याचे देखील समोर आले आहे. त्यामुळे कोरोनानंतर आता या नव्या व्हायरसविषयी आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे. चला तर जाणून घेऊया अलास्कापॉक्स व्हायरलविषयी अधिक माहिती.

अलास्कापॉक्स म्हणजे काय? (Alaskapox Virus)

अलास्कापॉक्स व्हायरस हा विटांच्या आकाराच्या व्हायरस वर्गाशी संबंधित आहे. हा व्हायरस प्राणी आणि मानवांना संक्रमित करू शकतो. अलास्कापॉक्स संक्रमणामुळे त्वचेवर जखमा होतात किंवा त्वचेला खाज येते. या व्हायरसचा प्रसार हा विशेषतः मांजरामुळे होत असून हा व्हायरस दुर्मिळ आणि अत्यंत घातक आहे, असे तज्ञ सांगतात.

अलास्कापॉक्समूळे १ मृत्यू

अलास्का येथे फेअरबँकजवळ एका महिलेत २०१५ साली अलास्कापॉक्सचा शोध लागला होता. म्हणून या विषाणूला अलास्कापॉक्स असे नाव देण्यात आले. पुढे या विषाणूचे ७ रुग्ण सापडले. मात्र, अलास्कापॉक्समुळे मृत्यू झाल्याची अमेरिकेत पहिली घटना घडली. ही मृत व्यक्ती वयस्कर असल्याचे समोर आले आहे. (Alaskapox Virus)

अलास्कापॉक्सचा फैलाव

अलास्कापॉक्स हा व्हायरस प्रामुख्याने लहान आणि सस्तन प्राण्यांमध्ये आढळून येतो. ज्यामध्ये विशेषतः लाल पाठ असणाऱ्या आणि चिंचुदरीसारख्या प्राण्यांचा समावेश आहे. तर आरोग्य अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की, कुत्रा आणि मांजर यांसारखे पाळीव प्राणी या व्हायरसचे वाहक असू शकतात. (Alaskapox Virus) दरम्यान अलास्कापॉक्समूळे मृत्यू झालेल्या व्यक्तीला हा आजार कसा झाला? याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र ही व्यक्ती जंगलाजवळ राहत होती आणि भटक्या मांजरांना सांभाळत होती. दरम्यान या भटक्या मांजरांत हा व्हायरस आढळला नसला तरी मांजराने संसर्ग झालेल्या उंदाराला मारले असेल आणि तिच्या नखातून हा विषाणू संबंधित व्यक्तीच्या शरीरात गेल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अलास्कापॉक्सची लक्षणे

अलास्कापॉक्स या विषाणूची काही मुख्य लक्षणे आहेत. ज्यामध्ये खालील लक्षणांचा समावेश आहे.

1) त्वचेवर जखम होणे.

2) लिम्फ नोड्समध्ये सूज येणे. (Alaskapox Virus)

3) सांधेदुखी अथवा मांसपेशीमध्ये दुखणे.

4) अशक्तपणा जाणवणे.

तज्ञांच्या अभ्यासानुसार, हा आजार बहुतेक कमकुवत प्रतिकारशक्ती असलेल्या लोकांना होण्याची शक्यता जास्त आहे. तसेच या विषाणूने मृत पावलेल्या व्यक्तीच्या मांजराला विषाणूची लागण झाली नव्हती. तरीही, मांजराच्या नखांमधूनच हा विषाणू पसरू शकतो असे अभ्यासात सांगण्यात आले आहे. त्यामुळे वरीलपैकी कोणतेही लक्षण आढळल्यास त्वरित डॉक्टरांकडून तपासणी करून घ्या, असे आव्हान करण्यात येत आहे. (Alaskapox Virus)