Albatya Galbatya : ‘अलबत्या गलबत्या’ रुपेरी पडद्यावर येणार; चिंची चेटकीण ‘3D जादू’ करणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Albatya Galbatya) मराठी नाटककार रत्नाकर मतकरी यांचं ‘अलबत्या गलबत्या’ हे अत्यंत गाजलेलं बालनाट्य आहे. या नाटकाला लहान मुलांनीच नव्हे तर मोठ्या माणसांनी सुद्धा प्रचंड प्रेम दिल आहे. यानंतर आता लवकरच हे बालनाट्य थ्रीडीमध्ये रुपेरी पडद्यावर अवतारण्यासाठी सज्ज झाले आहे. लेखक आणि दिग्दर्शक वरूण नार्वेकर या गाजलेल्या नाटकावरून चित्रपट करण्याचे शिवधनुष्य पेलत आहेत. या चित्रपटाची नुकतीच घोषणा करण्यात आली असून सोशल मीडियावर त्याचे टिझर पोस्टर रिलीज झाले आहे.

मध्यवर्ती भूमिकेत वैभव मांगले दिसणार (Albatya Galbatya)

‘अलबत्या गलबत्या’ या थ्रीडी चित्रपटामध्ये प्रसिद्ध मराठी अभिनेते वैभव मांगले मध्यवर्ती भूमिका साकारताना दिसणार आहेत. ‘अलबत्या गलबत्या’ नाटकामध्ये पूर्वी वैभव मांगले चिंची चेटकिणीची भूमिका साकारत होते. मात्र पुढे जाऊन त्यांनी हे नाटक सोडले. त्यावेळी प्रेक्षकांचा हिरमोड झाला होता. वैभव मांगले यांना पुन्हा एकदा चिंची चेटकिणीच्या भूमिकेत पाहण्याची प्रेक्षकांची इच्छा होती. आता या चित्रपटातून त्यांची ईच्छा पूर्ण होईल अशी चिन्हे दिसत आहेत. माहितीनुसार, हा चित्रपट पुढीलवर्षी १ मे २०२५ रोजी प्रदर्शित करण्यात येणार आहे. मात्र नुकताच या चित्रपटाचा टिझर रिलीज झाला आहे. जो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे.



‘अलबत्या गलबत्या’ चित्रपटाची निर्मिती एव्हरेस्ट एंटरटेन्मेंटचे संजय छाब्रिया, उदाहरणार्थ निर्मितचे सुधीर कोलते आणि न्यूक्लिअर अॅरोचे ओंकार सुषमा माने करत आहेत. भालजी पेंढारकर चित्र हे सहयोगी निर्माते आहेत. रत्नाकर मतकरी यांनी कथा, कादंबरी, नाटक असे विविध साहित्यप्रकार हाताळले. त्यांची अनेक नाटकं मराठी प्रायोगिक, व्यावसायिक रंगभूमीवर गाजली. त्याशिवाय त्यांनी बालरंगभूमीवरही अनेक यशस्वी प्रयोग केले होते. (Albatya Galbatya)’अलबत्या गलबत्या’ हे नाटकही त्यापैकीच एक… या बालनाट्यानं इतिहास घ़डवला.

लाभणार अत्याधुनिक VFX ची जोड

आता ‘अलबत्या गलबत्या’ नाटकाला रुपेरी पडद्यावर आणण्याचं शिवधनुष्य तरुण लेखक दिग्दर्शक वरूण नार्वेकर पेलत आहे. वरूणनं आतापर्यंत चित्रपट, वेब सीरिज केल्या आहेत. त्यात मुरांबा, दो गुब्बारे, एक दोन तीन चार यांचा समावेश आहे. तसेच त्यानं दिग्दर्शित केलेल्या अनेक जाहिरातीही गाजल्या आहेत. आता ‘अलबत्या गलबत्या’ (Albatya Galbatya) या नाटकाला तंत्रज्ञानाची जोड देऊन नव्या रुपात चित्रपट माध्यमातून आणण्यात येणार आहे. त्यामुळे अत्याधुनिक व्हीएफेक्सची जोड दिली जाणार आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट थ्रीडी मध्ये असल्यामुळे बच्चेकंपनीला एक वेगळाच अनुभव घेता येणार आहे.