Amazon Holi Sale 2024: Amazon वर सुरु झालंय होळीचं दुकान ; मिळत आहे 50 %पर्यंत सूट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Amazon Holi Sale 2024 : होळीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. संपूर्ण भारतात हा सण मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो. प्रसिद्ध ई कॉमर्स वेबसाईट Amazon वर सुद्धा होळीसाठी रंग , पिचकाऱ्या पूजेचे साहित्य , थंडाई ,मिठाई, स्नॅक्स अशा बऱ्याच वास्तुंवर भरघोस सूट मिळत आहे. चला जाणून घेऊया होळीच्या या खास ऑफर बद्दल

काय आहे सेल मध्ये ?

Amazon Holi Sale 2024 हा होळीच्या सणाच्या भावनेशी सुसंगतपणे विविध उत्पादने बजेटमधल्या किमतीत उपलब्ध करून देत आहे. विविध प्रकारच्या उत्पादनांवर भरघोस ऑफर मिळत आहे. पूजेच्या अत्यावश्यक वस्तूंपासून ते रंगीबेरंगी पोशाख, लज्जतदार मिठाई आणि रंग खेळण्यासाठी पिचकाऱ्या ,वॉटर गनपर्यंत, होळीच्या प्रत्येक खरेदीसाठी उत्पादने सेलमध्ये उपलब्ध आहेत.

कधीपर्यंत सेल ?

Amazon Holi Sale 2024 सध्या सुरु झाला असून हा सेल होळीच्या दिवसापर्यंत असेल. होळीशी संबंधित प्रत्येक वस्तू तुम्ही येथे वाजवी दरात ऑफर मध्ये खरेदी करू शकता.

या वस्तूंवर मिळेल सूट

  • Amazon Holi Sale 2024 मध्ये स्वीट्स, स्नॅक्स आणि थंडाई याशिवाय हॅम्पर्स वर 50 टक्क्यांपर्यंत सूट मिळत आहे.
  • होळीसाठी लागणाऱ्या पूजेच्या साहित्यावर 50 टक्क्यांपर्यंत सूट मिळत आहे. यामध्ये तुपाचे दिवे, धातूचे दिवे यांचा समावेश असेल.
  • याशिवाय गुजिया आणि चकली मेकर वर 50% पर्यंत सुट असेल.