साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या कोल्हापूरच्या आंबाबाई मंदिराविषयी आता एक महत्वाची बातमी समोर येत आहे. कोल्हापूरमधील प्रसिद्ध अंबाबाई आणि जोतिबा मंदिरात आता भाविकांना विशिष्ट पेहरावातच देवदर्शन करता येणार आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयानुसार, १५ मे २०२५ पासून ड्रेस कोड सक्तीने लागू करण्यात आला आहे. त्यामुळे दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांनी आता मंदिरात प्रवेश करण्याआधी आपला पेहराव नियमांनुसार ठेवणे गरजेचे ठरणार आहे.
कोणत्या पेहरावाला बंदी ?
विशेषतः, शॉर्ट्स, ट्रेंडिंग व उघड्या अंगाचे कपडे घालून मंदिरात प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्याऐवजी, भक्तांनी पारंपरिक कपडे किंवा शरीर झाकले जाणारे सभ्य वस्त्र परिधान करणे बंधनकारक करण्यात आले आहे. धार्मिक शिस्त आणि मंदिराचा पवित्र परिसर याचा सन्मान राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे समितीने स्पष्ट केले आहे.
कोल्हापुरातील आंबाबाई आणि जोतिबा ही देवस्थाने अतिशय लोकप्रिय असून हे दोन्ही देवता अनेकांचे कुलदैवत असल्यामुळे हजारो लोक याठिकाणी दर्शन घेण्यासाठी येत असतात. मे महिन्याच्या सुट्ट्यांमध्ये कोल्हापूरमध्ये भाविकांची मोठी गर्दी होते. मुंबई, पुण्यासह अनेक शहरांतून कोल्हापूरच्या अंबाबाई आणि जोतिबा दर्शनासाठी हजारो भाविक दरवर्षी येतात. त्यामुळे गर्दीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीनेही नवे नियम लागू करण्यात आले आहेत.
याच संदर्भात, पुणे एटीएसचे (Antiterrorism Squad) पथक अंबाबाई मंदिरात दाखल झाले आहे. भारत-पाकिस्तान दरम्यान सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, तसेच नव्याने लागू करण्यात आलेल्या ड्रेस कोडनंतर सुरक्षेच्या उपाययोजनांमध्ये वाढ करण्यात आली आहे. मंदिर परिसर, सीसीटीव्ही व्यवस्था, तसेच सुरक्षिततेचे सर्व अंग तपासण्यात येत आहेत.
नागरिकांच्या सोयीसाठी ऐतिहासिक पाऊल ! राज्यातील ‘या’ तालुक्याला मिळाली स्वतंत्र RTO ओळख