Amboli Village : जिवंतपणी स्वर्गसुख अनुभवायचं असेल तर कोकणातील ‘या’ गावाला भेट द्या; भान हरवून जाल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Amboli Village) संपूर्ण महाराष्ट्रात अशी अनेक ठिकाण आहेत जी पर्यटनासाठी विशेष प्रसिद्ध आहेत. पण कोकणाची बातच काही और आहे. कोकण म्हणजे निसर्गाचा चमत्कार आहे. ऋतू बदलत राहतात आणि कोकणाचे सौंदर्य प्रत्येक ऋतूनुसार बदलत राहते. मात्र, त्याचे आकर्षण जसेच्या तसे असते. त्यात जर पावसाळ्याबद्दल बोलायचं झालं तर मग आल्हाददायी अनुभवासाठी कोकणात नाही गेलो तर काय फायदा. सध्या उन्हाळ्याच्या दिवस सुरु असले तरीही गेल्या काही दिवसांपासून आकाशातली मळभ काही वेगळेच संकेत देतेय.

याशिवाय यंदा महाराष्ट्रातील मान्सून स्थिती आशादायी असेल, असे भाकीत हवामान खात्याने केले आहे. अशा मोसमात कोकणात जायचा विचार करत असाल तर डोंगर दऱ्यांनी संपन्न असलेल्या गावाला भेट द्या. आपण ज्या गावाविषयी बोलतोय ते गाव म्हणजे आंबोली (Amboli Village). मुख्य म्हणजे गावात सर्वाधिक पाऊस पडतो. त्यामुळे जर जिवंतपणी स्वर्गसुख अनुभवायचे असेल तर कोकणातील आंबोली भागात जरूर जा. येथील दर्जा सौंदर्यात असे हरवून जाल की भानावर यायची इच्छा सुद्धा होणार नाही.

महाराष्ट्राची चेरापुंजी (Amboli Village)

आंबोली हे गाव डोंगर दऱ्यांनी संपन्न आणि नैसर्गिक साधनसंपत्तीने संपन्न आहे. त्यामुळे या भागाचे सौंदर्य पावसाळ्यात अधिकच खुलून येते. महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस हा आंबोली गावात पडतो. म्हणूनच आंबोली गावाला ‘महाराष्ट्राची चेरापुंजी’ म्हणून ओळखले जाते.

पावसाळ्यात कोकणातील या गावाला भेट देण्यासाठी अनेक पर्यटक येत असतात. कारण इथे उंचावरून कोसळणारे फेसाळणारे पांढरेशुभ्र लहान मोठे धबधबे, हिरवीगार झाडी आणि डोळ्यासमोर उभे राहणारे ढग पाहायला मिळतात. शिवाय धुकं आणि पावसामुळे इथलं वातावरण आल्हाददायक बनते. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात आंबोलीला जाण्याचा बेत नक्की आखा.

सनसेट पहायला तोबा गर्दी

कोकणात जातेवेळी लागणाऱ्या (Amboli Village) आंबोली घाटात सूर्यास्त पाहण्याची मजा काही वेगळीच आहे. जगभराला प्रकाशमय करणारा सूर्य जेव्हा झोपी जातो तेव्हा कसा दिसतो? हे पाहण्यासाठी सनसेट पॉइंटवर प्रचंड गर्दी होते. इतकंच काय तर महादेव पॉइंटवरून ढगांची गर्दी आणि आदळआपट पहायला सुद्धा तितकीच मजा येते.

कसे जाल?

कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडीपासून सुमारे ३० किलोमीटर अंतरावर आंबोली आहे. आंबोली घाट आणि त्याचे सौंदर्य हे पर्यटकांचे खास आकर्षण आहे. त्यामुळे आंबोली (Amboli Village) हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते. शिवाय हे थंड हवेचे ठिकाण असल्यामुळे इथे कायम पर्यटक येत असतात.