Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांच्यावर अँजिओप्लास्टी; स्वतःच ट्विट करत दिली हेल्थ अपडेट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Amitabh Bachchan) बॉलिवूडचे महानायक अर्थात बिग बी अमिताभ बच्चन यांच्या चाहत्यांसाठी एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. अमिताभ बच्चन यांच्यावर आज १५ मार्च २०२४, शुक्रवारी सकाळी अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोकिलाबेन रुग्णालयात अमिताभ बच्चन यांच्यावर तज्ञ डॉक्टरांकडून शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. हार्ट ब्लॉकेजनंतर अमिताभ बच्चन यांना आरोग्याच्या दृष्टीने ही शस्त्रक्रिया करणे गरजेची होती. जी आज पार पडली.

अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया पार पडली

एका वृत्तानुसार, आज सकाळी ६ वाजता अमिताभ बच्चन यांना अत्यंत कडक सुरक्षेमध्ये कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यानंतर तज्ञ डॉक्टरांनी आवश्यक ती यंत्रणा वापरून अमिताभ (Amitabh Bachchan) यांच्यावर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया केली. ही शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडल्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून याबाबतची माहिती समोर आली आहे. अमिताभ बच्चन यांच्या शस्त्रक्रियेची माहिती मिळताच त्यांच्या चाहत्यांनी लाडक्या अभिनेत्याच्या तब्येतीबाबत चिंता व्यक्त केली आहे.

चाहते चिंतेत

अमिताभ बच्चन यांच्यावर वयाच्या ८१ व्या वर्षी अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आल्यामुळे त्यांचे चाहते चिंतेत आहेत. सोशल मीडियावर अमिताभ यांचे चाहते वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत त्यासारख्या प्रकृतीबाबत विचारणा करत आहेत. काही चाहते अमिताभ यांच्या उत्तम प्रकृती स्वास्थ्यासाठी देवाकडे प्रार्थना करत आहेत. (Amitabh Bachchan) अशातच अधिकृत सोशल मीडिया ट्विटरच्या माध्यमातून स्वतः अभिनेते अमिताभ बच्चन यांनी एक ट्विट शेअर केले आहे. या ट्विटच्या माध्यमातून त्यांनी आपल्या प्रकृतीबाबत माहिती दिली आहे.

‘बिग बीं’चे ट्विट (Amitabh Bachchan)

अमिताभ बच्चन यांनी शेअर केलेल्या ट्विटमध्ये त्यांनी अँजिओप्लास्टी शस्त्रक्रियेनंतर आपली प्रकृती स्थिर असल्याची माहिती चाहत्यांनी दिली आहे. तसेच या ट्विटमध्ये त्यांनी चाहत्यांच्या प्रेमासाठी त्यांचे आभार व्यक्त केले आहेत. या ट्विटमध्ये अमिताभ यांनी ‘कायम कृतज्ञ…’ असे लिहिले आहे.

दरम्यान, अमिताभ बच्चन यांची प्रकृती स्थिर असून तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली ते उपचार घेत असल्याचे समजत आहे. सध्या सर्वत्र अमिताभ बच्चन यांच्या प्रकृतीची चर्चा सुरु आहे. लवकरात लवकर त्यांनी बरे व्हावे आणि सुखरूप घरी परतावे म्हणून चाहते प्रार्थना करत आहेत. (Amitabh Bachchan)