Amrit Bharat Station Scheme: PM मोदींच्या हस्ते 2000 हून अधिक रेल्वे प्रकल्पांचे आज लोकार्पण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Amrit Bharat Station Scheme: देशभरात रेल्वेचे मजबूत जाळे पसरले आहे. दळणवळणाच्या साधनांमध्ये रेल्वे प्रमुख भूमिका बजावते. आता हे रेल्वेचे जाळे अधिक घट्ट होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज 41,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या सुमारे 2000 रेल्वे पायाभूत सुविधा प्रकल्पांची (Amrit Bharat Station Scheme) पायाभरणी, उद्घाटन केले जाणार आहे. हे उदघाटन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे केले जाणार असून आज (26) दुपारी 12:30 वाजता हा सोहळा पार पडणार आहे.

अमृत भारत स्टेशन (Amrit Bharat Station Scheme) योजनेअंतर्गत 553 रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासासाठी पायाभरणी मोदींच्या हस्ते होईल. 27 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पसरलेल्या या स्थानकांचा 19,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करून पुनर्विकास केला जाणार आहे.

जागतिक दर्जाच्या सेवा (Amrit Bharat Station Scheme)

ही स्थानके ‘सिटी सेंटर’ म्हणून काम करतील. जागतिक दर्जाच्या सेवांचा यामध्ये समावेश असेल. यात रूफटॉप प्लाझा, सुंदर लँडस्केप, इंटर मॉडेल कनेक्टिव्हिटी, उत्तम आधुनिक दर्शनी भाग, मुलांसाठी खेळण्याची (Amrit Bharat Station Scheme) जागा, किओस्क, फूड कोर्ट इत्यादी आधुनिक प्रवासी सुविधा असतील. शिवाय ही स्थानके पर्यावरणपूरक आणि अपंगांसाठी देखील सोयीस्कर असतील. या स्थानक इमारतींची रचना स्थानिक संस्कृती, वारसा आणि स्थापत्यकलेतून प्रेरित असेल.

1500 रोड ओव्हर ब्रिज आणि अंडरपासचे उद्घाटन

पंतप्रधान मोदी 1500 रोड ओव्हर ब्रिज आणि अंडरपासची पायाभरणी, उद्घाटन (Amrit Bharat Station Scheme) करतील. हे रोड ओव्हर ब्रिज आणि अंडरपास 24 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पसरलेले आहेत, या प्रकल्पांची एकूण किंमत अंदाजे 21,520 कोटी रुपये आहे. या प्रकल्पांमुळे गर्दी कमी होईल, सुरक्षा आणि कनेक्टिव्हिटी वाढेल आणि रेल्वे प्रवासाची क्षमता आणि कार्यक्षमता सुधारेल.