Anand Mahindra : सलाम!! वडिलांच्या मृत्यूनंतर 10 वर्षाचा मुलगा चालवतोय फूड स्टॉल; महिंद्रांनी दिली खास ऑफर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Anand Mahindra) सोशल मीडियावर बरेच व्हिडीओ व्हायरल होतात. त्यांपैकी काही व्हिडीओ अतिशय प्रेरणादायी असतात. सध्या सोशल मीडियावर एक असाच अत्यंत प्रेरणादायी व्हिडीओ व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये एक १० वर्षाचा लहान मुलगा आपल्या वडिलांच्या निधनानंतर स्ट्रीट फूड स्टॉल चालवताना दिसतोय. अवघ्या १० वर्षाच्या वयात या मुलाने जी जिद्द आणि मेहनतीची तयारी दाखवली आहे ती खरच दाद देण्यासारखी आहे. या मुलाचा व्हिडीओ पाहून देशातील आघाडीचे उद्योजक आनंद महिंद्रा यांनी त्याला एक ऑफर दिली आहे. ज्याची सर्वत्र चर्चा आहे.

वयाच्या १० व्या वर्षी दाखवलेल्या जिद्दीला सलाम

उद्योजक आनंद महिंद्रा हे अनेकदा अशा पोस्ट शेअर करताना दिसतात. एखाद्याच्या कामाला सलाम करतेवेळी ते कधीच मागेपुढे पाहत नाही. त्यामुळे सोशल मीडियावर ते कायम चर्चेत असतात. (Anand Mahindra) त्यांनी नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये त्यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओत एक लहान मुलगा एग-चिकन रोल विकताना दिसत आहे. दिल्लीतील टिळक नगर परिसरातील हा व्हिडीओ असून या मुलाचे वय १० वर्ष असल्याचे तो स्वतःच सांगताना दिसतोय. हा व्हिडीओ संजय घोष यांनी शेअर केला असून यातील मुलगा पंजाबी आहे आणि तो पंजाबी भाषेतच संवाद साधत आहे.

वडिलांच्या मृत्यूनंतर अंगावर पडली जबाबदारी

या व्हिडिओत त्या मुलाला इतक्या कमी वयात तुला एग आणि चिकन रोल बनवण्यास कोणी शिकवलं? असं विचारलं असता तो म्हणतो, ‘माझ्या वडिलांनी शिकवलं’. यावर पुढे संवाद साधताना या मुलाचं नाव जसप्रित असल्याचं तो सांगतो. (Anand Mahindra) तसेच वडील कुठे आहेत? असे विचारले असता तो मुलगा आपल्या वडिलांचे निधन झाल्याचे सांगतो. तसेच आईदेखील घर सोडून गेल्याचे तो सांगतो. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी हळहळ व्यक्त करत या मुलाच्या जिद्दीचे कौतुक केले आहे. तर आनंद महिंद्रांनी हा चिमुकला म्हणजे हिंमतीचं दुसरं नाव असल्याचं म्हणत त्याला एक खास ऑफर दिली आहे.

आनंद महिंद्रांची ऑफर (Anand Mahindra)

आनंद महिंद्रा यांनी म्हटलंय, ‘हिंमतीचं दुसरं नाव जसप्रीत आहे. मात्र, यामुळे त्याच्या शिक्षणावर परिणाम होता कामा नये. मला वाटतं हा दिल्लीतील टिळक नगरमधील व्हिडीओ आहे. कोणाकडे त्याचा कॉन्टॅक्ट नंबर असेल तर तो शेअर करा प्लीज. (Anand Mahindra) महिंद्रा फाऊंडेशनची टीम त्याच्यासंदर्भात विचार करुन त्याच्या शिक्षणासाठी आम्ही कशी मदत करु शकतो याची चाचपणी करेल’. आनंद महिंद्रांनी शक्य त्या पद्धतीने या मुलाला मदत करण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर अनेकांनी त्यांच्या या ऑफरसाठी त्यांचे भरभरून कौतुक केले आहे.