Anant Ambani Wedding Date : अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट ‘या’ दिवशी अडकणार विवाहबंधनात; लग्नपत्रिकेचा फोटो VIRAL

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Anant Ambani Wedding Date) गेल्या अनेक दिवसांपासून अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या विवाहसोहळ्याची जोरदार चर्चा सुरु आहे. मध्यंतरी प्री वेडिंग सोहळ्यातील जल्लोष पाहून जो तो अनंत आणि राधिका यांचा शाही विवाह सोहळा कसा असेल? याविषयी बोलताना दिसत आहे. या भव्य प्री- वेडिंगनंतर हे जोडपं जुलै महिन्यात सात फेरे घेणार असल्याचे सांगितले जात होते. अशातच आता सोशल मीडियावर अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नपत्रिकेचा पहिला फोटो शेअर करण्यात आला आहे. जो तुफान व्हायरल होतो आहे.

कधी आणि कुठे आहे लग्न? (Anant Ambani Wedding Date)

रिलायन्स ग्रुपच्या मुकेश अंबानी यांचा धाकट्या मुलाचे म्हणजेच अनंत अंबानी यांचे जुलै महिन्यात लग्न पार पडणार आहे. २०२३ मध्ये त्यांचा साखरपुडा राधिका मर्चंटसोबत झाला होता. यानंतर साधारण वर्षभराने म्हणजे आता मार्च २०२४ मध्ये त्यांचे भव्य प्री-वेडिंग फंक्शन पार पडले. ज्याला अनेक दिग्ज मंडळींसह बॉलिवूडकरांनी देखील हजेरी लावली होती.

(Anant Ambani Wedding Date) यानंतर आता अनंत- राधिका यांच्या लग्नाची तारीख समोर आली आहे. येत्या १२ जुलै २०२४ रोजी अनंत आणि राधिका हे लग्न बंधनात अडकणार आहेत. माहितीनुसार, अनंत आणि राधिकाच्या लग्नाचे सगळे विधी मुंबईत बीकेसी येथील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये पार पडतील. त्यांच्या लग्नाचे सर्व विधी पारंपारिक हिंदू पद्धतीने होणार आहेत.

३ दिवस होणार कार्यक्रम

एकीकडे अनंत आणि राधिका यांच्या दुसऱ्या प्री- वेडिंग सोहळ्याची चर्चा सुरु आहे. अशातच दुसरीकडे त्यांच्या लग्नाची पत्रिका समोर आली आहे. यानुसार शुक्रवार १२ जुलै २०२४ रोजी अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट एकमेकांसोबत सात फेरे घेऊन वैवाहिक आयुष्याची सुरुवात करणार आहेत. (Anant Ambani Wedding Date) तर शनिवारी १३ जुलै २०२४ रोजी या नवीन जोडप्याला शुभाशीर्वाद देण्याचा कार्यक्रम पार पडणार आहे. त्यानंतर रविवारी १४ जुलै २०२४ रोजी त्यांच्या लग्नाचं जंगी रिसेप्शन आयोजित करण्यात आलं आहे.

पाहुण्यांची यादी बरीच मोठी

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या परी वेडिंग सोहळ्यासाठी जितकी मंडळी उपस्थित होती त्याहून अधिक मंडळी त्यांच्या लग्नासाठी उपस्थित राहतील असा अंदाज आहे. माहितीनुसार, त्यांच्या लग्नाला बॉलिवूडच नव्हे तर हॉलिवूडचे कलाकारसुद्धा उपस्थित राहणार आहेत. (Anant Ambani Wedding Date) पाहुण्यांच्या यादीत शाहरुख खान, सलमान खान, बच्चन कुटुंब, विराट -अनुष्का, विकी- कॅटरिना अशा बड्या स्टार्सची नवे आहेत. शिवाय बिल गेट्स, मार्क झुकरबर्ग, लॅरी फिंक, स्टीफन श्वार्झमन, बॉब इगर, इवांका ट्रम्प अशा परदेशी पाहुण्यांच्या उपस्थितीचीदेखील शक्यता आहे.