राज्यभरात रस्त्यांचे जाळे अधिक मजबूत करण्याकडे शासनाचा भर दिसतो आहे. अशातच पुण्यातील रिंग रोड बाबत एका महत्वाची अपडेट हाती आली आहे चला जाणून घेऊया…
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) 83 किलोमीटर अंतरामध्ये अंतर्गत रिंग रोड विकसित करण्यात येत आहेत. या रस्त्यावर पीएमआरडीएकडून पहिल्या टप्प्यात पाच ठिकाणी मल्टीमोड विकसित करण्यात येणार आहेत. त्यामुळे एकाच ठिकाणी वाहतुकीचे विविध पर्याय उपलब्ध होऊ शकणार आहेत पीएमआरडीएच्या प्रारूप विकास आराखड्यामध्ये एकूण 13 आरक्षित आहेत त्यापैकी प्राधान्यांने पाच मल्टीमोड हब विकसित करण्यासाठी पीएमआरडीए च्या सभेमध्ये नुकतीच मंजुरी मिळाली आहे.
या ठिकाणी होणार हब
सोळू, वाघोली, कदम वाघ वस्ती, भिल्लारेवाडी आणि भुगाव अशा पाच ठिकाणी मल्टीमोड हब विकसित केले जाणार आहेत. यासाठी आवश्यक भूसंपादन आणि बांधकामासाठी एकूण 370 कोटी 13 लाख रुपये इतका खर्च होणार आहे. पीपीपी तत्त्वावर त्याचा विकास करण्याचे नियोजन आहे.
दरम्यान रिंग रोडच्या पहिल्या टप्प्यातील कामांतर्गत निर्गुंडी ते वडगाव शिंदे या अंतरातील रस्त्याचा विस्तृत प्रकल्प अहवाल तयार झाला आहे. सोळू ते निरगुडीदरम्यान होणाऱ्या रस्त्याच्या विस्तृत प्रकल्प अहवालाची छाननी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग पुणे यांच्या वतीने सुरू आहे.
पीएमआरडीए कडून एकूण 83 किमी अंतर्गत रिंग रोड विकसित केला जात आहे. त्यासाठी 14,200 कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. रिंग रोडच्या पहिल्या टप्प्यात सोळू ते वडगाव शिंदे असा सुमारे पाच किलोमीटर अंतराचा रस्ता केला जाणार त्यासाठी भूसंपादन प्रक्रिया सुरू आहे. या प्रक्रियेसाठी पीएमआरडीएच्या अर्थसंकल्पात 113 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.