ठाणेकरांची होणार वाहतूक कोंडीतून सुटका ! ठाणे रिंग मेट्रो प्रकल्पाच्या सुधारित आराखड्याला मंजुरी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रिमंडळाची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत 38 महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. ठाणेकरांच्या मेट्रो रेल्वे प्रकल्पाबाबत देखील महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून ठाणे रिंग मेट्रो रेल्वेच्या 12,220 कोटींच्या सुधारित आराखड्यास कॅबिनेट बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली आहे. या निर्णयामुळे ठाणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे.

ठाण्यातील वर्तुळाकार मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या कामाला गती देण्यासाठी आवश्यक असलेल्या 12,200 कोटी दहा लाख रुपयांच्या सुधारित आराखड्याला मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली आहे. या मेट्रो मार्गाची लांबी ही 29 किलोमीटर इतकी आहे. या मार्गावर वीस उन्नत स्थानके आणि दोन भूमिगत स्थानक आहेत.

यामुळे प्रकल्पामुळे ठाण्यातल्या नवपाडा, वागळे इस्टेट, डोंगरी पाडा, हिरानंदानी इस्टेट, कोलशेत, साकेत यासारखे महत्त्वाचे भाग मेट्रो ने जोडले जाणार आहेत. नियोजित वेळेप्रमाणे काम पूर्ण झाल्यास 2019 पर्यंत ठाणे रिंग मेट्रो ही ठाणेकरांच्या सेवेत दाखल होईल. या प्रकल्पामुळे ठाण्यातील वाहतूक मार्ग हे मोकळे होणार असून वाहतूक कोंडी पासून ठाणेकरांची मुक्तता होणार आहे.