Apsara Movie : प्रवीण तरडे आणि मंगेश देसाईंच्या शुभहस्ते ‘अप्सरा’ चित्रपटाचे म्युझिक लाँच

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Apsara Movie) गीतकार मंगेश कांगणे यांनी आतापर्यंत ‘सूर निरागस हो’, ‘माझा आनंद हरपला’ अशी सर्वोत्तम गाणी संगीत विश्वाला दिली आहेत. यानंतर गीतकार कांगणे हे आता आगामी चित्रपट ‘अप्सरा’च्या माध्यमातून संगीतकार म्हणून भेटीस येत आहेत. या चित्रपटातील गाणी मंगेश कांगणे यांनी स्वतः संगीतबद्ध केली असून या निमित्ताने गीतकाराने संगीतकार होण्याचा दुर्मीळ योग साधला गेला आहे.

लेखक, दिग्दर्शक प्रवीण तरडे आणि अभिनेता, निर्माता मंगेश देसाईं यांच्या शुभहस्ते चित्रपटाचे म्युझिक लॉन्च करण्यात आले. याप्रसंगी चित्रपटाची संपूर्ण टीम आवर्जून उपस्थित होती. येत्या १० मे २०२४ ला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

गीतकाराने संगीतकार होण्याचा दुर्मिळ योग्य

सुनील भालेराव यांच्या ‘श्रमण फिल्म्स’ या निर्मिती संस्थेतर्फे ‘अप्सरा‘ चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. ही या संस्थेची पहिलीच निर्मिती आहे. चित्रपटसृष्टीत अनेक वर्ष कार्यरत असलेल्या चंद्रकांत पवार यांनी ‘अप्सरा’ची कथा, पटकथा लिहिली आहे. शिवाय दिग्दर्शन देखील त्यांनीच केले आहे. मंगेश कांगणे गेली अनेक वर्षं मराठी चित्रपटसृष्टीत गीतकार म्हणून कार्यरत आहेत.



त्यांनी आपल्या लेखणीने अनेक हिट गाणी मराठी चित्रपटांना दिली आहेत. (Apsara Movie) शिवाय अनेक म्युझिक अल्बमसाठीदेखील त्यांनी गाणी लिहिली आहेत. भावगर्भ, सहजपणे तोंडी रुळणारी शब्दरचना, व्यक्तिरेखेची नेमकी अभिव्यक्ती, कथानकाची नेमकी गरज ओळखून गीतलेखनामध्ये मंगेश कांगणे माहीर आहेत. आता गीतलेखनाच्या पुढे जात मंगेश यांना सुरांचीही संगत लाभली आहे.

काय म्हणाले कांगणे?

चित्रपटाविषयी बोलताना मंगेश कांगणे म्हणाले की, ‘२०१३ मध्ये माझी पहिली फिल्म दुनियादारी आली आणि त्यातील ”टिकटिक वाजते डोक्यात” या माझ्या पहिल्याच गीताला रसिक प्रेक्षकांचे अफाट प्रेम मिळाले. आज जवळपास १० वर्षांहून अधिक या क्षेत्रात काम करुन जवळपास १२५हुन अधिक चित्रपटांसाठी मी काम केले आहे. (Apsara Movie)

अनेक दिग्गज लोकांसोबत काम करण्याची संधी मला मिळाली. खुप नवनवीन गोष्टी मला शिकायला मिळाल्या. यातूनच आपणही संगीतकार म्हणून या क्षेत्रात पाऊल टाकावे म्हणून मी उत्सुक होतो. अशातच मला ”अप्सरा”च्या निमित्ताने ही संधी मिळाली. यासाठी मी निर्माते सुनील भालेराव आणि दिग्दर्शक चंद्रकांत पवार यांचा आभारी आहे’.

मध्यवर्ती भूमिकेत झळकणार ‘हे’ कलाकार Apsara Movie

‘अप्सरा’ या चित्रपटातील एकूण ३ गाणी मंगेश कांगणे यांनी केली आहेत. या तीनही गाण्यांचे लेखन आणि संगीत दिग्दर्शन मंगेश यांनी केले आहे. गायक अभय जोधपूरकर, गायिका आनंदी जोशी, ओंकार स्वरुप, भैय्या मोरे, मेघा मुसळे यांच्या सुमधुर आवाजात चित्रपटातील गीते स्वरबद्ध करण्यात आली आहेत.

Apsara Movie तर या चित्रपटात सुयश झूंजुरके, मयूरी आव्हाड, अक्षता पाडगावकर, मेघा घाडगे, शशांक शेंडे, विट्ठल काळे विजय निकम, मयूर पवार, राजेश भोसले, आशिष वारंग आदी कलाकारांच्या महत्वपूर्ण भूमिका आहेत. राजा फडतरे यांनी कॅमेरामन, निलेश राठोड संकलन तर सुबोध आरेकर, इमरान मालगुणकर, कृतिक माज़िरे यांनी नृत्यदिग्दर्शक म्हणून काम पाहिले आहे.