हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Army Canteen) तुम्ही बऱ्याचदा ऐकलं असेल की, आर्मी कॅन्टीनमध्ये वस्तू स्वस्त मिळतात. कदाचित कधी कुणासोबत खरेदी देखील केली असेल. तर तुमच्या लक्षात आलं असेल की, बाहेरील बाजार किंमतीपेक्षा अमूक एक गोष्ट आर्मी कॅन्टीनमध्ये स्वस्तात विकली जातेय. अगदी खाण्यापिण्याच्या सामानापासून ते घरात लागणाऱ्या इतर वस्तूंपर्यंत बरंच सामान, उत्पादनं या ठिकाणी स्वस्त मिळतात. आर्मी कॅन्टीनमधून मिळणारी ही सुविधा केवळ लष्करातील जवान, सुरक्षा दलातील विविध हुद्द्यांवर असणारे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी असते. पण प्रश्न असा आहे की, आर्मी कॅन्टीनमध्ये बाहेरील किंमतीपेक्षा कमी आणि सवलतीच्या दरात वस्तूंची विक्री का होते? तुम्हालाही हा प्रश्न पडलाय? तर चला उत्तर जाणून घेऊया.
कोणाला मिळतो लाभ? (Army Canteen)
आर्मी कॅन्टीन स्टोर्स डिपार्टमेंटचा लष्कराच्या सेवेत असणाऱ्या आणि निवृत्त अधिकारी तसेच जवानांसह विविध हुद्द्यांवरील अधिकाऱ्यांना लाभ घेता येतो. एकूणच भारतीय लष्करातील जवान आणि त्या संबंधित अधिकारी वर्गासाठी ही सुविधा सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे इथे मिळणाऱ्या घसघशीत सवलतीचा लाभ केवळ त्यांनाच घेता येतो. आज जवळपास १३.५ मिलियन म्हणजेच १ कोटी ३० लाखांहून अधिक जवान या सवलतीचा फायदा घेत आहेत.
इथे सामान्य नागरिकांना खरेदी करता येत नाही. (Army Canteen) कारण ही सुविधा केवळ लष्करी सेवेत असणाऱ्यांपुरता सीमीत आहे. आर्मी कॅन्टीनच्या सुविधांचा लाभ घेण्यासाठी लष्कराच्या जवानांना स्मार्ट कार्ड जारी केलं जातं. ज्याचा वापर करून त्यांना येथे खरेदी करता येते. या कार्डचे २ प्रकार असतात. एक ग्रॉसरी आणि दुसरं लिकर.
ग्रॉसरी कार्ड आणि लिकर कार्डमधील फरक काय?
(Army Canteen) लष्कराच्या जवानांना आर्मी कॅन्टीनच्या सुविधांचा लाभ घेण्यासाठी देण्यात आलेल्या ग्रॉसरी कार्डच्या माध्यमातून किराणा, विद्युत उपकरणं अशा वस्तूंची खरेदी करता येते. तर, लिकर कार्डवर मद्य खरेदी करता येते.
आर्मी कॅन्टीनमध्ये स्वस्त दरात सामान विक्री का होते?
एका वृत्तानुसार, आर्मी कॅन्टीनमध्ये मिळणाऱ्या उत्पादनांवर सरकारकडून जीएसटीमध्ये ५०% सवलत दिली जाते. त्यामुळे इथे मिळणाऱ्या वस्तूंची विक्री कमी दरात करणे शक्य होते. (Army Canteen) पण एक लक्षात घ्या, इथे उत्पादनं कमी दरात मिळत असले तरी त्यांच्या खरेदीवर मात्र मर्यादा घालण्यात आली आहे. त्यामुळे इथे कुणीही मर्यादेहून जास्त सामानाची खरेदी करू शकत नाही.