Artemis 2 Mission : अवकाशात मृत्यू झाल्यास मृतदेहाचं काय करणार? नासाने केला धक्कादायक खुलासा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Artemis 2 Mission) गेल्या काही काळात माणसाने केलेली प्रगती अत्यंत उल्लेखनीय ठरली आहे. NASA च्या आर्टेमिस- 1 मिशनने यश मिळवल्यानंतर आता आर्टेमिस- II मोहिमेची जय्यत तयारी सुरु आहे. या अंतर्गत येत्या २०२५ सालापर्यंत माणसाने चंद्रावर पाऊल ठेवलेच पाहिजे, हे नासाचे मूळ उद्दिष्ट असल्याचे समोर आहे. दरम्यान, या मोहिमेवेळी जर अंतराळात एखाद्या मानवाचा मृत्यू झाला तर त्याच्या मृतदेहाचं काय करणार? असा एक प्रश्न निरामय झाला आहे. मात्र यावर देखील नासाने अभ्यास केला असून या मोहिमेत त्याच आधीच प्लॅनिंग करून ठेवलं आहे. ते प्लॅनिंग नक्की काय आहे? याविषयी आपण जाणून घेऊया.

आर्टेमिस- II चंद्रावर नाही तर चंद्राभोवती भ्रमण करणार

नासाच्या, आर्टेमिस – II या मोहिमेअंतर्गत कोणताही अंतराळवीर चंद्रावर उतरणार नाही, अशी माहिती समोर आली आहे. एका वृत्तानुसार, या मोहिमेसाठी अंतराळात जाणारे अंतराळवीर हे चंद्राभोवती भ्रमण करणार आहेत. (Artemis 2 Mission) त्यामुळे चंद्र आणि मंगळ ग्रहावर स्पेस स्टेशन उभारण्याच्या अनुषंगाने ही मोहिम अत्यंत महत्वाची ठरेल असे स्पष्ट होत आहे.

आर्टेमिस- II मिशनसाठी किती अंतराळवीरांची नियुक्ती?

NASA म्हणजेच अमेरिकन अवकाश संशोधन संस्था आणि CSA म्हणजेच कॅनेडियन स्पेस एजन्सी ही मोहीम फत्ते करण्यासाठी काम करत आहे. या दोन्ही संस्था आर्टेमिस-II मोहिमेवर अत्यंत बारकाईने काम करत असून या मोहिमेची पूर्ण जबाबदारी त्यांच्यावर आहे. (Artemis 2 Mission) त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्टेमिस-II या मोहिमेसाठी कमांडर रीड विझमन, पायलट व्हिक्टर ग्लोव्हर, मिशन स्पेशलिस्ट 1 क्रिस्टीना हॅमॉक कोच आणि मिशन स्पेशलिस्ट 2 जेरेमी हॅन्सन असे एकूण ४ अंतराळवीर अवकाशात पाठवणार आहेत.

आत्तापर्यंत अंतराळात 20 अंतराळवीरांचा मृत्यू (Artemis 2 Mission)

आतापर्यंत नासाच्या अनेक मोहिमा पार पडल्या. अगदी १९८६ पासून ते २००३ पर्यंत वेगवेगळ्या मोहिमांच्या माध्यमातून नासाने मोठी प्रगती केली आहे. मात्र, या मोहिमेअंतर्गत नासाने पाठवलेल्या काही अंतराळवीरांना आपला जीव गमवावा लागला आहे. नासाच्या रिपोर्टनुसार, १९७१ मध्ये सोयुझ- 11 या मिशन दरम्यान एकूण ३ अंतराळवीर मृत्यूमुखी पडले होते. तर १९६७ मध्ये अपोलो- 1 लाँच पॅडला लागलेल्या आगीमध्ये ३ अंतराळवीरांना आपण गमावले आहे. आतापर्यंत नासाच्या मोहिमांमध्ये अवकाशात गेलेल्या अंतराळवीरांपैकी एकूण २० अंतराळवीरांच्या मृत्यू झाल्याची नोंद आहे.

मोहिमेदरम्यान अवकाशात मृत्यू झाल्यास मृतदेहाचं काय?

यावेळी एक दोन नव्हे तर तब्बल ५० वर्षांनंतर माणूस पुन्हा एकदा अंतराळात जाणार आहे. त्यामुळे यावेळी नासा अधिक सतर्क राहणार आहे. अंतराळवीरांना अंतराळात निरोगी ठेवण्यासाठी संशोधक अनेक प्रकारे संशोधन करत आहेत. मात्र, तरीही या मोहिमे अंतगर्तत जर एखाद्या मानवाचा अंतराळात मृत्यू झाला तर त्याच्या मृतदेहाचं काय करणार? असा एक मोठं सवाल उपस्थित राहिला आहे. यावर देखील NASA ने काही महत्वपूर्ण माहिती प्रदान केली आहे.

(Artemis 2 Mission)एका वृत्तानुसार याबाबत NASA ने सांगितलंय की, या मोहिअंगर्त एखाद्या अंतराळवीराचा मृत्यू झाला तर सहकारी अंतराळवीर संबंधित अंतराळवीराचा मृतदेह एका कॅप्सुलच्या माध्यमातून पृथ्वीवर पाठवतील. कारण, एकदा का मोहिम सुरु झाली तर नंतर अंतराळवीरांना ही मोहिम संपल्याशिवाय परत माघारी फिरता येणार नाही.

म्हणूनच, एका कॅप्सुलच्या माध्यमातून मृत पावलेल्या अंतराळवीराचा मृतदेह पृथ्वीवर पाठवला जाईल. मात्र, एखाद्या कारणास्तव तसे शक्य झाले नाही तर तो मृतदेह चेंबरमध्ये किंवा विशेष बॉडी बॅगमध्ये मोहीम पूर्ण होईपर्यंत जतन केला जाईल. मोहिम संपल्यानंतर इतर अंतराळवीरांसह तो मृतदेह पृथ्वीवर आणला जाईल. (Artemis 2 Mission) कारण चंद्र किंवा मंगळ ग्रहावर कोणत्याही प्रकारे मृतदेहावर अंत्य संस्कार करणे अशक्य आणि धोकादायक ठरू शकतात.

चंद्र आणि मंगळावर अंत्यसंस्कार करणे धोकादायक

अंतराळात मृत्यू झाल्यास तो मृतदेह जतन करून पृथ्वीतलावर आणणे याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. कारण चंद्र आणि मंगळ ग्रहावर मृतदेहाचे अंत्यसंस्कार करणे अशक्य आहे. यासाठी लागणारी भरपूर ऊर्जा इथे मिळू शकत नाही. शिवाय एखादा मृतदेह या ग्रहांवरील जमिनीत दफन करणे सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य नाही. कारण मृतदेहातील बॅक्टेरिया, विषाणू आणि इतर जीव हे चंद्र तसेच मंगळ ग्रहावरील पृष्ठभाग दूषित करु शकतात. जे अत्यंत धोकादायक सिद्ध होऊ शकते. (Artemis 2 Mission)