Ashadhi Ekadashi : संपूर्ण राज्यभरात उद्या दिनांक 17 जुलै रोजी आषाढी एकादशी साजरी केली जाणार आहे. यानिमित्ताने मोठ्या संख्येने भाविक पंढरपूरला जात असतात. एकादशीच्या निमित्ताने महाराष्ट्र शासनाकडून एस टी महामंडळाच्या तसेच रेल्वे विभागाकडून देखील विशेष गाड्या सोडण्यात आल्या आहेत. भुसावळ येथून विशेष रेल्वे गाडीने वारकरी, भाविक पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी (Ashadhi Ekadashi) रवाना झाले. याबाबतची माहिती खासदार रक्षा खडसे यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून दिली आहे.
यावेळी जळगांव व बुलडाणा जिल्ह्यासह परिसरातील वारकरी आज मोठ्या उत्साहात भुसावळ रेल्वे स्टेशन येऊन अनआरक्षित मोफत “विशेष आषाढी रेल्वे” गाडीने विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरला रवाना झाले. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे खडसे यांनी गाडीची शिफारस (Ashadhi Ekadashi) केली होती. त्यानुसार या गाडीला मान्यता मिळाली आणि आज (16 ) अखेर दु.01.30 वा ही गाडी पंढरपूर साठी रवाना झाली. यावेळी खासदार रक्षा खडसे त्यांच्यासह इतर अधिकाऱ्यांनी हिरवी झेंडी दाखवून या गाडीला रवाना केले.
हे “विशेष आषाढी रेल्वे” गाडी उद्या दि.17 रोजी सकाळी 3.30 वाजता पंढरपूर येथे पोहोचणार आहे. तर उद्याच रात्री 10.30 वा पंढरपूर येथून परतीच्या प्रवासाला निघणार असुन, दि.18 रोजी भुसावळ येथे परत येणार आहे. सदर अनआरक्षित मोफत “विशेष आषाढी रेल्वे” गाडीचे रक्षा खडसे यांच्या मार्फत एकूण जनरल तिकिटांची स्वखर्चाने खरेदी करण्यात आली असून, सदर सुविधा वारकऱ्यांसाठी (Ashadhi Ekadashi) मोफत करण्यात आली आहे. यावेळी खडसे आणि इतर आधिकऱ्यानी पंढरपूर वारीसाठी जाणाऱ्या वारकरी आणि भाविकांशी प्रत्यक्ष संवाद साधून मोठ्या उत्साहात विठुरायाच्या दर्शनासाठी रवाना केले.