Ashok Saraf : अशोक मामांचा ‘मास्टर दिनानाथ मंगेशकर पुरस्काराने सन्मान! भावूक होत म्हणाले, ‘हा क्षण मी कधीच..’

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Ashok Saraf) मराठी कलाविश्वातील अत्यंत लोकप्रिय कलाकार ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ हे अलीकडेच ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने सन्मानित झाले. त्यानंतर आता मास्टर दीनानाथ मंगेशकर प्रदीर्घ नाट्यसेवा पुरस्काराने त्यांचा विशेष गौरव करण्यात आला आहे. मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या ८२ व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित पुरस्कार सोहळा हा दीनानाथ नाट्यगृहात पार पडला. दरवर्षी मंगेशकर प्रतिष्ठानातर्फे संगीत, नाटक, कला, वैद्यकीय, पत्रकारिता, सामाजिक क्षेत्रातील दिग्गजांचा सत्कार केला जातो.

यंदा या खास सोहळ्यात मंगेशकर कुटुंबीयांतर्फे दिला जाणारा मानाचा पुरस्कार अशोक सराफ (Ashok Saraf) यांना प्रदान केला गेला. यावेळी मंगेशकर कुटुंबीयांसह बॉलीवूडचे महानायक अभिनेते अमिताभ बच्चन, मराठी अभिनेता- दिग्दर्शक चिन्मय मांडलेकर आणि असे बरेच दिग्गज उपस्थित होते. दरम्यान, अभिनेते अशोक सराफ यांनी पुरस्कार स्वीकारल्यानंतर आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या. उपस्थित मान्यवरांसमोर भाषण करतेवेळी ते भावनिक झाल्याचे दिसून आले.

काय म्हणाले अशोक सराफ? (Ashok Saraf)

मंगेशकर कुटुंबीयांनी सन्मानित केल्यानंतर अशोक सराफ म्हणाले की, ‘आता माझ्याबरोबर या मंचावर सगळे थोर कलावंत बसलेले आहेत. यांच्यासमोर माझा सन्मान होणं ही खरंच मोठी गोष्ट आहे. आजवर मला अनेक पुरस्कार मिळाले. आता मला आठवतही नाही आणि मोजताही येत नाही. पण, आजचा हा पुरस्कार माझ्यासाठी फारच महत्त्वाचा आहे. (Ashok Saraf) मी एक कलाकार आहे आणि एका असमान्य गायक कलाकाराच्या म्हणजेच मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या नावाने मिळालेला हा पुरस्कार माझ्यासाठी खूप मोठा आहे. एका असामान्य परिवाराकडून हा पुरस्कार मला मिळतोय आणि आज इथे एक मोठा असामान्य नट देखील उपस्थित आहे. ही सगळ्यात मोठी आणि माझ्या कायम लक्षात राहणारी गोष्ट आहे’.

हा क्षण मी कधीही विसरू शकणार नाही…

‘हा सन्मान केवळ माझ्या एकट्याचा नसून तुम्हा सर्वांचा आहे. कलाकार त्याच्या परीने वेगवेगळे प्रयोग करत असतो. पण, ते प्रयोग तुम्हाला पटले नाहीत तर, त्याचा काहीच उपयोग नसतो. पण, मी केलेलं काम तुम्हाला आवडलं, तुम्ही दरवेळी त्याबद्दल तुमच्या भावना व्यक्त केल्या यासाठी मी तुम्हा सर्वांचा ऋणी आहे. (Ashok Saraf) आज मी माननीय हृदयनाथ मंगेशकर आणि त्यांच्या संपूर्ण परिवाराचे आभार मानतो की, त्यांनी मला या पुरस्काराच्या लायक समजलं. माझी एवढ्या वर्षांची तोडकी मोडकी सेवा त्यांनी समजून घेतली त्यासाठी मी त्यांचा अत्यंत आभारी आहे. हा क्षण माझ्या हृदयात राहील आणि मी कधीही विसरू शकणार नाही’.