Asus Zenfone 12 Ultra: 50MP ट्रिपल कॅमेरा, 5500mAh बॅटरीसह लाँच झाला Asus Zenfone 12 Ultra स्मार्टफोन

0
3
Asus Zenfone 12 Ultra
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Asus Zenfone 12 Ultra – आसुसने (Asus) नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन Asus Zenfone 12 Ultra लाँच केला आहे. हा स्मार्टफोन ग्राहकांना आकर्षक फीचर्स आणि दमदार परफॉर्मन्ससह उपलब्ध होणार आहे. त्याचसोबत हा AI फीचर्सनी परिपूर्ण असणार आहे. त्यामुळे अनेक लोक याकडे आकर्षित होताना दिसणार आहे. या फोनमध्ये Snapdragon 8 Elite प्रोसेसर, 6.78-इंच LTPO AMOLED डिस्प्ले, 50MP ट्रिपल रियर कॅमेरा, आणि 5500mAh बॅटरी यांसारखी अनेक वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. तर चला या स्मार्टफोन बदल अधिक माहिती जाणून घेऊयात.

फीचर्स (Asus Zenfone 12 Ultra) –

डिस्प्ले –

6.78-इंच Samsung E6 AMOLED LTPO डिस्प्ले, 120Hz रिफ्रेश रेट, 2500 निट्स पीक ब्राइटनेस आणि Gorilla Glass Victus 2 संरक्षणासाठी दिले आहे .

प्रोसेसर आणि सॉफ्टवेअर –

या फोनमध्ये Qualcomm Snapdragon 8 Elite चिपसेट, Adreno 830 GPU, आणि Android 15 ऑपरेटिंग सिस्टम आहे .

बॅटरी आणि चार्जिंग –

5500mAh बॅटरी 65W वायर्ड चार्जिंग आणि 15W वायरलेस चार्जिंग सपोर्टसह उपलब्ध होणार आहे .

डिझाइन आणि बिल्ड –

IP68 वॉटर आणि डस्ट रेझिस्टन्स, 163.8 x 77.0 x 8.9mm डायमेन्शन आणि 220 ग्रॅम वजन.

कॅमेरा फीचर्स (Asus Zenfone 12 Ultra)

रियर कॅमेरा –

50MP प्राथमिक कॅमेरा
13MP अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स
32MP टेलीफोटो लेन्स (3x ऑप्टिकल झूमसह)

फ्रंट कॅमेरा –

32MP RGBW सेल्फी कॅमेरा

AI कॅमेरा फीचर्स –

6-Axis Hybrid Gimbal Stabilizer
AI Object Sense
AI HyperClarity
AI Portrait Video
AI Night Vision

कनेक्टिव्हिटी आणि इतर फीचर्स –

5G, 4G LTE, Wi-Fi 7, NFC, Bluetooth 5.4, 3.5mm हेडफोन जॅक आणि USB Type-C पोर्ट
इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक सपोर्ट
AI Call Translator, AI Transcript आणि AI Wallpaper

रंग आणि किंमत –

आसुस झेनफोन 12 अल्ट्रा तीन रंगांमध्ये उपलब्ध आहे – ब्लॅक, व्हाइट आणि ग्रीन. (Asus Zenfone 12 Ultra)

12GB रॅम + 256GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 29,990 NT डॉलर (सुमारे रु 80,000) आहे.
16GB रॅम + 512GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 33,199 NT डॉलर (सुमारे रु 85,300) आहे.