Raigad Fort : रायगडाच्या हिरकणी कड्यावर 2 तरुण अडकले; शॉर्टकट वापरणे आले अंगलट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Raigad Fort) आज तारखेनुसार स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे. त्यामुळे आजच्या या खास दिवशी छत्रपती शिवरायांना अभिवादन करण्यासाठी अनेक शिवप्रेमी आणि शिवभक्त हे विविध गडांना भेट देताना दिसत आहेत. यांपैकी काही शिवप्रेमी हे स्वराज्याची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रायगडावर पोहोचले आहेत. दरम्यान, रायगडावर एक दुर्घटना घडल्याचे समोर आले आहे. रायगडाच्या हिरकणी कड्यावर २ तरुण अडकले असून त्यांची सुटका करण्यासाठी रेस्क्यू टीमला बोलावण्यात आले आहे.

शिवजयंतीनिमित्त अनेक शिवभक्त हे विविध गड किल्ल्यांवर जात असतात. त्यानुसार, अनेक शिवप्रेमी हे शिवरायांचा प्रताप आणि त्यांच्या प्रभावी इतिहासाला नमन करण्यासाठी किल्ले रायगडावर पोहोचले आहेत. रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी आहे आणि त्यामुळे शिवजयंतीनिमित्त इथे लाखो शिवभक्त आले आहेत. (Raigad Fort) अशातच शिवजयंतीच्या खास दिवसानिमित्त किल्ले रायगडावर गेलेले २ तरुण हिरकणी कड्यावर अडकले आहेत. त्यांची परिस्थिती अत्यंत विचित्र आणि गोंधळली असून त्यांच्या सुटकेसाठी महाडहून दोन रेस्क्यू टीम बोलावल्याचे समोर आले आहे. अद्याप तरी एकही टीम न पोहोचल्याने बचावकार्य सुरू झालेले नाही.

शॉर्टकट आला अंगलट (Raigad Fort)

हे तरुण शॉर्टकट म्हणून रोपवेच्या मार्गावरुन किल्ल्यावर चढून जात असताना अडकल्याचे समजत आहे. यावेळी काही स्थानिकांनी या तरुणांना हिरकणी कड्यावर अडकलेले आणि घाबरलेल्या अवस्थेत पाहिले. त्यानंतर संपूर्ण परिसरात गोंधळ उडाला आणि प्रत्येकाचे लक्ष या तरुणांच्या हालचालींकडे वळले. (Raigad Fort) हे तरुण अशा ठिकाणी अडकले आहेत जिथून या गडावर परत जाणे किंवा खाली उतरणे दोन्ही गोष्टी अत्यंत कठिण आहेत. त्यामुळे या ठिकाणी अडकले असताना हे तरुण एका दगडाचा आधार घेऊन थांबलेले दिसत आहेत.

हे दृश्य अगदी मन हेलावून टाकणारे आहे. जीव मुठीत घेऊन थांबलेले हे तरुण आपल्या सुटकेच्या प्रतीक्षेत आहेत. हिरकणी कड्यावर अडकल्यामूळे दोघा तरुणांना मदत मिळणे अवघड झाले. अशावेळी त्यांनी रुमालाच्या इशाऱ्याने आसपास दिसणाऱ्या लोकांचे लक्ष आपल्याकडे ओढून घेतले. शिवाय आरडा ओरडा करून जोरजोरात हाका मारून आपल्या सुटकेसाठी इतरांकडे मदत मागत आहेत. (Raigad Fort)

या तरुणांची सुटका करण्यासाठी रेस्क्यू टीम पोहोचेपर्यंत इतर लोकांनी या तरुणांच्या सुटकेसाठी इतर पर्याय शोधले. मात्र त्यांना यश आले नाही. (Raigad Fort) आता जोपर्यंत रेस्क्यू टीम येत नाही आणि वरुन दोर टाकून त्यांना सोडवत नाही, तोपर्यंत त्यांची सुटका होईल असं वाटत नसल्याचे मत स्थानिकांनी नोंदवले आहे. त्यामुळे आता रेस्क्यू टीम शर्थीचे प्रयत्न करून या तरुणांची सुटका करेल हीच आशा आहे.