हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्र सरकारने अटल पेंशन योजना (Atal Pension Yojana) सुरू केली आहे, ज्याचा मुख्य उद्देश गरीब अन गरजू लोकांना निवृत्तीनंतर आर्थिक सहाय्य देणे आहे. या योजनेद्वारे, 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांना नियमित पेंशन मिळेल. यामुळे त्यांचे निवृत्त जीवन अधिक आरामदायक अन सुरक्षित होईल. ही योजना विशेषतः अशा व्यक्तींसाठी आहे ज्यांचे नियमित उत्पन्न नाही. योजनेत सहभाग घेण्यासाठी नागरिकांना काही विशिष्ट वयापर्यंत नियमित योगदान देणे आवश्यक आहे. अटल पेंशन योजना, देशातील गरीब आणि मागास वर्गासाठी एक महत्त्वाचा आधार ठरला आहे. तर चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
केंद्र सरकार चालवलेली पेंशन योजना –
अटल पेंशन योजना ही एक केंद्र सरकार चालवलेली पेंशन योजना आहे. या योजनेद्वारे लाभार्थ्यांना 1000 रुपयांपासून 5000 रुपयांपर्यंत पेंशन मिळते. या योजनेचा मुख्य उद्देश निवृत्तीनंतर लोकांना वित्तीय सुरक्षा देणे आहे. ही योजना खास निवृत्त जीवनासाठी तयार केली आहे.
योजनेतील पात्रता –
अर्जदार भारतीय नागरिक असावा.
अर्जदाराची वय 18 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त असावे आणि 40 वर्षे किंवा त्यापेक्षा कमी असावे.
अर्जदाराकडे KYC अन आधारशी लिंक केलेला बँक खात असणे आवश्यक आहे.
असा अर्ज करा –
सर्वप्रथम, आपल्या जवळच्या बँक शाखेत जाऊन त्याठिकाणी अर्ज फॉर्म भरा .
अर्ज फॉर्ममध्ये आवश्यक माहिती भरून, आवश्यक कागदपत्रे सादर करा.
फॉर्म सबमिट केल्यानंतर, बँक अधिकाऱ्यांकडून पुढील प्रक्रिया सुरू केली जाईल.
अर्ज भरताना, आपल्याला 1000 ते 5000 रुपयांपर्यंत कोणता प्लॅन निवडायचा हे विचारले जाईल.
काही दिवसात बँक खाते या योजनेसाठी लिंक होईल.
अशा प्रकारे, आपण अटल पेंशन योजनेमध्ये (Atal Pension Yojana) सहजपणे अर्ज करू शकता आणि निवृत्तीनंतर आर्थिक सुरक्षितता मिळवू शकता.