Atal Setu : अटल सेतू कमालच ! एका महिन्यात वसूल झाला करोडोंचा रोड टॅक्स

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Atal Setu : देशातील सर्वात लांब सागरी पूल म्हणून अटल सेतूची ख्याती आहे. जानेवारी महिन्यात 12 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या सेतूचे मोठ्या दिमाखात उद्घाटन झाले. त्यानंतर 13 तारखेला हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. अटल सेतू बद्दल एक महत्वाची माहिती समोर आली आहे. केवळ एका महिन्याच्या कालावधीत करोडोंची टोलवसुली अटल सेतूवरून करण्यात आली आहे.

मुंबई ते नवी मुंबई जोडणाऱ्या अटल सेतू (Atal Setu) पुलाच्या उद्घाटनानंतर त्याला चांगलाच वेग आला आहे. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, या पुलावरील वाहतूक लक्षणीयरीत्या वाढली असून अवघ्या एका महिन्यात टोल टॅक्समधून 13.95 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.

देशात अटल सेतूच्या (Atal Setu) नावावर आणखी एक विक्रम नोंदवला गेला आहे. टोल न भरता पुढे जाणाऱ्या वाहनांकडूनही टोल वसूल केला जात आहे.म्हणजेच ज्यांचे फास्टग नाही त्यांच्याकडून चालनवसुली केली जात आहे. यासाठी देशात प्रथमच पुलावर टोलवसुली चालान काढण्यात येत आहे. आतापर्यंत ३२ हजार वाहनांविरुद्ध टोलवसुली चालान काढण्यात आली आहे.

पहिल्या महिन्यातच करोडोंचा टोल वसूल (Atal Setu)

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) आकडेवारीनुसार, गेल्या महिन्यात 8.13 लाखांहून अधिक वाहनांनी अटल सेतू ओलांडला आहे. यापैकी सुमारे 98% कार होत्या, ज्यावरून असे दिसून येते की बहुतेक खाजगी चालक पुलाचा वापर करत आहेत. महिनाभरात सेतूवरून 8 लाख 13 हजार 774 वाहनांनी प्रवास केला. मात्र त्यात 7 लाख 97 हजार 587 वाहने ही चारचाकी प्रवासी वाहनेच होती. मात्र, सध्या मोठ्या वाहनांची वर्दळ कमी असून, या पुलाचा अद्यापही त्यांच्या मार्गात समावेश करण्यात आलेला नसल्यामुळे या मार्गावरून अवजड (Atal Setu) वाहनांच्या वाहतुकीला मनाई आहे.

पुलाची वैशिष्टये (Atal Setu)

  • हा पूल 6 लेनचा असून प्रत्येक दिशेने 3 लेन आहेत.
  • हा पूल 16.5 किलोमीटर समुद्रावर आणि 5.3 किलोमीटर जमिनीवर बांधण्यात आला आहे.
  • हा पूल 35 मीटर उंच आहे, त्यामुळे मोठी जहाजे या पुलावरून जाऊ शकतात.
  • हा पूल 15,000 कोटी रुपये खर्चून (Atal Setu) बांधण्यात आला आहे.