Ayodhya Property : मुंबईतील प्रसिद्ध बिल्डर्सचा ओढा आयोध्याकडे; नक्की काय आहे कारण ?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Ayodhya Property : अयोध्येत राममंदिराचा अभिषेक झाल्यापासून अनेक नवनवीन गोष्टी अयोध्येत पाहायला मिळत आहेत. आता अयोध्या शहर मुंबईच्या रिअल इस्टेट बिल्डर्सची पहिली पसंती ठरत आहे. सध्या मुंबईतील किमान सात नामांकित बांधकाम व्यावसायिक अयोध्येत गेल्याचे वृत्त आहे. यामध्ये हिरानंदानी ग्रुप, गोदरेज प्रॉपर्टीज, रेमंड रिॲलिटी, द हाऊस ऑफ अभिनंदन लोढा आणि ओबेरॉय रियल्टी यासारख्या मोठ्या नावांचा समावेश आहे. बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी द हाऊस ऑफ अभिनंदन लोढा या 7-स्टार एन्क्लेव्ह द सरयूमध्ये 14.5 कोटी रुपयांचा भूखंड (Ayodhya Property ) खरेदी केला आहे.याचा आणखी एक परिणाम म्हणजे तेथील मालमत्तेच्या किमती 179 टक्क्यांनी वाढल्या आहेत.

बिल्डर बनवत आहेत लँड बँक (Ayodhya Property )

फ्री प्रेस जर्नलमधील वृत्तानुसार, सध्या मुंबईतील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अयोध्येला आपले ठिकाण बनवत आहेत. सर्व बांधकाम व्यावसायिक तेथे अधिकाधिक लँड बँक तयार करत आहेत. प्रत्येक गटाला अयोध्येत आपला व्यवसाय विकास (Ayodhya Property ) कार्य चालवायचे आहे. हे रिअल इस्टेट बिल्डर्स तिथे तीन प्रकारे काम करत आहेत. काही लोक प्लॉटिंग करून जमीन विकण्यास तयार आहेत तर काही लोक तेथे निवासी टाऊनशिप विकसित करत आहेत. काही बांधकाम व्यावसायिक तेथे व्यावसायिक आणि हॉस्पिटॅलिटी व्यवसायात अधिक रस घेत आहेत.

जमिनीची मोठ्या प्रमाणात खरेदी

मिळालेल्या माहितीनुसार या अहवालात गेल्या तीन (Ayodhya Property ) महिन्यांपासून तेथे मोठे गट सक्रिय झाल्याचा दावा करण्यात आला आहे. तेथे सक्रिय असलेल्या बिल्डर्समध्ये ओबेरॉय रिॲल्टी, हिरानंदानी ग्रुप, गोदरेज प्रॉपर्टीज, रेमंड रिॲल्टी, रनवाल ग्रुप आणि के. के रहेजा कॉर्पचा समावेश आहे. गेल्या तीन महिन्यांत त्यांनी या अयोध्या नगरीत मोठ्या प्रमाणात जमिनीची खरेदी केल्याची माहिती आहे.