गडचिरोलीत पुन्हा दारूबंदीचा एल्गार; दारूचे साठे जाळून साजरा केला दसरा

ही निवडणूक दारूमुक्त निवडणूक यासह इतरही घोषणांनी आसमंत दणाणून सोडला. निवडणूक काळात गावात दारू येऊ देणार नाही यासाठी डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवणार असल्याचेही या महिलांनी सांगितले.

सतेज पाटलांना हरवलंय; पुतण्याला हरवणं कठीण नाही – प्रमोद सावंत

कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व जागांवर महायुतीचेच उमेदवार निवडून येतील असा विश्वास गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला. गेल्या पाच वर्षात फडणवीस सरकारने केलेल्या कामांमुळे महाराष्ट्रात महायुतीला पुन्हा सत्ता मिळणार आहे.

कुणी डॉक्टर देतं का डॉक्टर; राज्यात डॉक्टरांची ६४३ पदे रिक्त; आरोग्यव्यवस्था व्हेंटिलेटरवर

विशेष सेवा देणाऱ्या डॉक्टरांची एकूण ६४३ पदे रिक्त असल्याने आरोग्य सेवेवर विपरीत परिणाम होत आहे. या रिक्त जागा भरण्याचे शासनाचे आश्वासन हवेतच विरले असून शेवटच्या व्यक्तीपर्यंत आरोग्यसेवा पोहचल्याचा शासनाचा दावा पोकळ ठरत आहे.

राज्यात १३ ऑक्टोबरपासून मोदींचा प्रचारदौरा; ९ ठिकाणी होणार ‘मोदीगर्जना’

विधानसभा निवडणुकांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारपासून महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत असून राज्यात त्यांच्या नऊ प्रचार सभा होणार आहेत.

३७० चं काय सांगता, अनुच्छेद ३७१ रद्द करा, पाठिंबा देतो ; शरद पवार यांचा भाजपला टोला

३७१ अनुच्छेदानुसार नागालँड, मेघालय, सिक्कीम, मणिपूर या ईशान्येकडील राज्यांमध्ये कुणालाच जमीन खरेदी करता येत नाही. त्यावर तुम्ही का बोलत नाही.’ असं म्हणत एक नवीन खेळणं शरद पवारांनी भाजपपुढे सादर केलं आहे.

आमचं ठरलय, आता फक्त दक्षिण उरलंय; सतेज पाटील अमल महाडिकांना धूळ चारणार ??

कोल्हापूरचे काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी आमच ठरलय, आता दक्षिण उरलय अशी नवी घोषणा केली आहे. यामुळं कोल्हापूर दक्षिणेतील वातावरण गुरुवारपासून ढवळून निघालं आहे.

देशावर संकट आल्यावर राहुल गांधी इटलीला पळून जातात – योगी आदित्यनाथ; परभणीतही कलम ३७० चा पुनरुच्चार

राज्यात निष्क्रिय झालेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर टीका करताना कलम ३७० रद्द केल्यामुळे आतंकवादी कारवायांना अटकावच होईल असा विश्वास व्यक्त करत मोदी सरकारचं कौतुक योगी आदित्यनाथ यांनी केलं.

महायुतीच्या स्टेजवरून शिवसेना खासदार हद्दपार; उस्मानाबादमध्ये निंबाळकर – पाटील कोल्ड वॉरला आणखीनच धार

सभास्थळावर लावण्यात आलेल्या बॅनरवर शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांचा फोटो नाही. महायुतीची सभा असल्यामुळे कार्यकर्त्यांच्या प्रचारावेळी भाजपबरोबर सेनेचेही झेंडे असं चित्र असताना सेनेचा एकही झेंडा या परिसरात पहायला मिळाला नाही.