Ayurvedic Kadha : पावसाळ्यात प्या ‘हा’ इम्युनिटी बूस्टर काढा; जो संसर्गांना ठेवतो चार हात दूर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Ayurvedic Kadha) पावसाळा सुरु झाला की, सोबत आनंद, हर्ष घेऊन येतो. पण यासोबत आजारपणसुद्धा आणतो. पावसाळ्यात बदलते वातावरण आपल्या आरोग्यावर विशेष परिणाम करत असते. अशा वातावरणामुळे आपली रोग प्रतिकारक शक्ती कमकुवत होऊ लागते. परिणामी विविध संसर्गजन्य आजार होण्याची शक्यता बळावते. पावसाळ्यात हवा दमट असते आणि या दिवसांमध्ये अनेक रोगजंतू हवेतून पसरतात. त्यामुळे पावसाळ्यात बरेच लोक सतत आजारी पडताना दिसतात.

खास करून सर्दी – पडसं, खोकला, ताप हे आजार पावसाळ्यात डोकं वर काढतात. जे थेट आपल्या रोग प्रतिकारक शक्तीवर हल्ला करून आपल्याला आतून कमजोर करतात. अशावेळी आपल्याला इम्युनिटी बूस्ट करण्याची गरज असते आणि यासाठी पावसाळ्याच्या दिवसात सर्वात प्रभावीपणे आयुर्वेदिक काढे काम करतात. (Ayurvedic Kadha) ज्यामध्ये तुळस आणि हळदीचा काढा आपली रोगप्रतिकारक शक्ती अनेक पटींनी मजबूत करण्यास मदत करते. आज आपण हा काढा कसा बनवायचा आणि त्याचे सेवन कसे करायचे? याविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत.

तुळस – हळदीचा आयुर्वेदिक काढा (Ayurvedic Kadha)

पावसाळ्यात संसर्गजन्य आजारांपासून आपल्याला संरक्षण हवे असेल तर त्यासाठी आपली रोग प्रतिकारक शक्ती मजबूत असायला हवी. याकरता तुळस आणि हळदीचा काढा मदत करतो. कारण तुळशीमध्ये अँटी- बॅक्टेरियल, अँटी- फंगल आणि अँटी- बायोटिक गुणधर्म असतात. तर हळदीमध्ये अँटी- बॅक्टेरियल, अँटी- फंगल गुणधर्म असतात. हळदीतील इम्युनोमोड्यूलेटरी प्रभावामुळे रोग प्रतिकारशक्ती मजबूत होते. शिवाय संक्रमण, विषाणू आणि जीवाणूंपासूनदेखील आपल्याला रक्षण मिळते. तुळस आणि हळद आपल्या औषधी गुणधर्मांमुळे आयुर्वेदातही फायदेशीर मानले जातात. असे हे दोन्ही पदार्थ काढ्याच्या निमित्ताने एकत्र आल्यास अधिक गुणकारी लाभ मिळतात.

काढा बनवण्यासाठी लागणारे साहित्य

  • पाणी – १ ग्लास
  • हळद – १/२ चमचा
  • तुळशीची पाने – ८ ते १२
  • गूळ – २ चमचे (पावडर) किंवा १ छोटा खडा
  • लवंग – ३ ते ४
  • दालचिनी – १ छोटा तुकडा

काढा बनवण्याची कृती

तुळस आणि हळदीचा काढा बवण्यासाठी सर्वात आधी एक पॅन घ्या. (Ayurvedic Kadha) यामध्ये १ ग्लास पाणी घाला. यानंतर त्यामध्ये हळद, तुळशीची पाने, लवंगा आणि दालचिनीचा तुकडा टाका. साधारण १५ मिनिटे पाण्याला चांगले उकळू द्या. यानंतर पाण्याचा रंग सोनेरी होईल. मग हे मिश्रण गाळून घ्या आणि कोमट करा. आता यात गूळ मिसळा. तुमचा आयुर्वेदिक तुळस – हळदीचा काढा तयार.

‘असे’ करा सेवन

तुळस – हळदीचा काढा आपली रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी अत्यंत लाभदायी आहे. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात हा काढा या जरूर प्या. (Ayurvedic Kadha) जर तुम्ही सर्दी किंवा फ्लूमूळे त्रस्त झाले असाल तर हा काढा तुम्हाला दिवसातून २ वेळा आणि किमान २ दिवस पिणे गरजेचे आहे. शिवाय हा काढा नियमित प्यायल्यास आजारी पडण्याची शक्यता मिटेल.