Bad Habit : खाताना TV पाहण्याची सवय असेल तर आत्ताच सोडा; दुष्परिणाम जाणून लागेल धक्का

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Bad Habit) अनेक लोकांना जेवताना टीव्ही पाहण्याची सवय असते. रोजची दगदग आणि दिवसभरातील कामाचा क्षीण घालवण्यासाठी क्षणभर विरंगुळा म्हणून टीव्ही पाहणे ठीक आहे. पण तुम्हीही जर जेवताना टीव्ही पाहत असाल तर लक्षात घ्या, तुम्ही तुमच्या आरोग्याचं स्वतःच नुकसान करत आहात. ते कसं? याविषयी काही तज्ञांनी संशोधन केलं आहे. ज्यामध्ये त्यांनी टीव्ही पाहताना आरोग्यावर काय दुष्परिणाम होतात याविषयीओ सांगितले आहे.

काय सांगतात तज्ञ?

तज्ञ सांगतात की, टीव्ही बघताना जेवण करणे ही बाब नक्कीच आनंददायी वाटत असेल. पण, यामुळे तुम्ही आजारी पडू शकता. कारण टीव्ही पाहताना जेवण केल्याने तुमचे मन स्थिर राहत नाही. (Bad Habit) परिणामी, तुम्ही काय खाताय? हेसुद्धा तुम्हाला कळत नाही’. या नादात कधी कधी जास्त तर कधी कधी कमी अन्न ग्रहण केले जाते. याचा परिणाम थेट तुमच्या शरीरावर होतो. हा परिणाम असा की, जास्त अन्न खाल्ल्याने पोटात बिघाड होऊ शकतो.

अन्न पचायला शरीराला खूप मेहनत करावी लागते. (Bad Habit) शिवाय याचा झोपेवर देखील परिणाम होऊ शकतो. तसेच कमी जेवल्यामुळे आतड्यांचे नुकसान होऊ शकते. चयापचय क्रियेत अस्थिरता येऊ शकते. इतकेच काय तर जेवणातून मिळणाऱ्या आवश्यक गूणतत्त्वांची कमतरता होते. याचाही तुमच्या झोपेवर नक्कीच परिणाम होऊ शकतो.

स्नॅकिंगची सवय त्याहून वाईट

अनेकांना टीव्हीसमोर बसलं की, स्नॅकिंगची सवय असते. (Bad Habit) अर्थात पॅकेज्ड फूड क्रेविंगमूळे तुम्ही स्वतःला थांबवू शकत नाही. पण तुमची सवय मुलांना देखील लागते आणि याचे परिणाम वाईट होतात. अशा पदार्थांमध्ये बॅड कार्ब्स आणि कॅलरी जास्त असतात. त्यामुळे असे खाद्यपदार्थ खातेवेळी, साखर आणि फॅट्स तसेच मिठाचे आपण किती सेवन करतोय याकडे दुर्लक्ष होते. परिणामी आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात.

जेवताना टीव्ही नकोच (Bad Habit)

जेवण करताना टीव्ही पाहण्याची सवय असेल तर आत्ताच मोडा. कारण यामुळे अनेक शारीरिक व्याधींचा सामना करावा लागू शकतो. हि सवय मोडण्यासाठी जेवण करण्यापूर्वी थोडा वेळ शांत बसा. दीर्घ श्वास घ्या. मन स्थिर करा आणि मग जेवणावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करा. अन्नाचा रंग आणि चवीवर लक्ष द्या.

प्रत्येक घास नीट चावून खा आणि सावकाश आनंदाने जेवण करा. एकदा पोट भरले की त्यानंतर परत खाऊ नका. यामुळे वजन नियंत्रणात राहील. शिवाय पॉट भरल्यामुळे शांत झोप लागेल. परिणामी दुसरा दिवस फ्रेश जाईल. (Bad Habit)