Bajirao Well : बाजीरावांची 7 कमानी असलेली विहीर…अभियांत्रिकीचे अप्रतिम उदाहरण

bajirao well
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Bajirao Well : महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात इतिहाच्या अनेक पाऊलखुणा सापडतात. मग इथली मंदिरे , किल्ली ,वाडे अशा सगळ्याच गोष्टींचा यात समावेश होतो. अशा अनेक ऐतिहासिक वस्तू आहेत ज्या आताच्या काळात पाहिल्यावर आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. आज आपण अशाच एका ऐकतिहासिक वास्तुबद्दल जाणून घेणार आहोत.

महाराष्ट्रातील मराठवाडा हा पेशव्यांच्या (Bajirao Well) शौर्याचा इतिहासाने भरलेला आहे. मराठ्यांच्या शौर्याची साक्ष देणाऱ्या अशा शेकडो वास्तू व किल्ले या परिसरात आहेत. आज अशाच एका विहिरीची कहाणी जाणून घेऊया ज्याला 300 वर्षांचा इतिहास आहे.

महाराष्ट्रातील काही ऐतिहासिक विहिरी शतकानुशतके इतिहासाची साक्ष देत आहेत. अशीच एक विहीर स्वराज्याची राजधानी असलेल्या सातारा शहरात आहे. बाजीराव पेशव्यांनी बांधलेली विहीर बाजीराव विहीर (Bajirao Well) म्हणून ओळखली जाते.

विशेष म्हणजे शुक्रवार पेठेत असलेली ही विहीर दुमजली आहे. सुंदर दगडी कोरीव काम आणि शंभरपेक्षा जास्त खोली असलेल्या या विहिरीने अनेक पिढ्यांची तहान भागवली.

सात कमानींची विहीर– बाजीराव विहिरीला (Bajirao Well) एकूण सात कमानी आहेत. त्यामुळे या विहिरीला सात कमानीची विहीर असेही म्हणतात. विहिरीच्या मुख्य कमानीवर राजेशाही चिन्ह, दोन शराफ पुतळे आणि छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र मोठे शाहू महाराज यांचा पुतळा कोरलेला आहे.

महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या विहिरींमध्ये बाजीराव पेशव्यांची विहीर (Bajirao Well) तिसऱ्या क्रमांकावर आहे. सध्या ही विहीर छत्रपती उदयनराजे भोसले आणि छत्रपती कल्पनाराजे भोसले यांच्या मालकीची आहे, जे छत्रपतींचे थेट तेरावे वंशज आहेत.

शाहू काळातील विहीर – ही विहीर सातारा शहराचे जनक छत्रपती शाहू महाराज यांच्या काळातील असल्याचे सांगितले जाते. विहिरीचे पाणी पिण्यासाठी वापरले जात असे. याच विहिरीच्या वरच्या भागात छत्रपती शाहू महाराज आणि बाजीराव पेशवे भेटत असत.

या विहिरीच्या वरच्या भागात झालेल्या बैठकीनंतर अनेक मोहिमाही ठरल्याचं सांगण्यात येत (Bajirao Well) आहे. गेल्या 300 वर्षांच्या इतिहासात ही विहीर कधीच कोरडी पडली नसल्याचेही अवसरे सांगतात.

पोस्टकार्डवर ऐतिहासिक विहीर – 2023 मध्ये राष्ट्रीय पोस्ट दिनानिमित्त स्टेप वेल हेरिटेज अंतर्गत बाजीराव पेशवे विहीर हे टपाल तिकीट बनवण्यात आले. अवसरे म्हणाले की, ऐतिहासिक बाजीराव पेशवे विहिरीचा (Bajirao Well) हा मोठा सन्मान आहे.