Bank FD Interest : FD वर ‘या’ बँका देतात भरगोस परतावा; गुंतवणुकीवर मिळतो अधिक व्याजाचा फायदा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Bank FD Interest) सुरक्षित भविष्याच्या दृष्टिकोनातून विचार केल्यास लक्षात येते की, गुंतवणूक ही आजची गरज आहे. त्यामुळे गेल्या काही काळात गुंतवणूकदारांची संख्या वाढली आहे. आपण केलेली गुंतवणूक ही भविष्यात आपल्यासाठी आर्थिक पूल ठरते. त्यामुळे चांगल्या ठिकाणी आणि चांगल्या योजनेत गुंतवणूक करणे कधीही फायदेशीर ठरते. दरम्यान, गुंतवणूकदारांसाठी गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. मात्र गुंतवणूकदार कायम अशा योजनांमध्ये गुंतवणूक करतात ज्यामध्ये त्यांना चांगला परतावा मिळेल.

इतकेच नव्हे तर, गुंतवणूकदारांसाठी त्यांच्या गुंतवणुकीची सुरक्षा अत्यंत महत्वाची बाब असते. त्यामुळे गुंतवणूक करताना कोणतीही व्यक्ती किमान दहावेळा विचार करते आणि मग गुंतवणूक करते. यामध्ये गुंतवणूकदार हे सरकारी योजना आणि बँकांच्या योजनांवर सर्वाधिक विश्वास ठेवतात. (Bank FD Interest) आता बँकांच्या योजनेबाबत बोलायचे झाले तर मुदत ठेव म्हणजेच एफडी ही योजना सर्वात जास्त विश्वासार्ह मानली जाते. कारण या योजनेत गुंतवणूक करणाऱ्या ग्राहकांना सुरक्षेसह चांगला परतावा मिळतो. त्यामुळे आज आपण अशा बँकांविषयी जाणून घेणार आहोत ज्या आपल्याला एफडीवर सर्वात जास्त व्याजाचा फायदा देतात.

मित्रांनो, देशात अनेक बँका आहेत. ज्या आपल्या ग्राहकांच्या आर्थिक सुरक्षेचा विचार करून विविध योजना उपलब्ध करून देत असतात. यामध्ये देशातील काही लघु वित्त बँका आपल्या ग्राहकांना मुदत ठेवीवर अर्थात एफडीवर ८ टक्क्यांपेक्षा जास्त व्याज देतात. या लघु वित्त बँका कोणत्या त्याविषयी आपण माहिती घेऊ.

FD वर सर्वाधिक व्याज देणाऱ्या लघु वित्त बँका (Bank FD Interest)

1. सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक

सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक आपल्या ग्राहकांना FD साठी ७ ते १० वर्षाचा कालावधी प्रदान करते. या FD वर सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक आपल्या ग्राहकांना ४ टक्के ते ८.६५ टक्के इतका व्याजदर देते. तसेच २ वर्ष २ दिवसात मॅच्युअर होणाऱ्या या FD वर ८.६५ टक्के दराने जास्तीत जास्त व्याज दिले जाते. (Bank FD Interest) हा व्याजदर सूर्योदय स्मॉल फायनान्स बँकेने २२ डिसेंबर २०२३ पासून लागू केला आहे.

2. फिनकेअर स्मॉल फायनान्स बँक

फिनकेअर स्मॉल फायनान्स बँकेत FD करण्यासाठी ग्राहकांना ७ दिवस ते १० वर्षाचा कालावधी मिळतो. या FD वर ३ टक्के ते ८.६१ टक्क्यांपर्यंत व्याज दिले जाते. या बँकेत ७५० दिवसांची FD बनवता येते. ज्यावर सर्वाधिक व्याजदर ८.६१ टक्के दिला जातो. फिनकेअर स्मॉल फायनान्स बँकेने हा व्याजदर २८ ऑक्टोबर २०२३ पासून लागू केला आहे.

3. AU स्मॉल फायनान्स बँक

AU स्मॉल फायनान्स बँक ही सामान्य नागरिकांना मुदत ठेवीत गुंतवणूक करण्याची चांगली संधी देते. यामध्ये ७ दिवस ते १० वर्षाच्या कालावधीची सुविधा आहे. तसेच या मुदत ठेवीवरील व्याज हे ३.७५ टक्के ते ८ टक्क्यादरम्यान आहे. या बँकेतील FD योजनेचा कालावधी हा एकूण १८ महिन्याचा आहे. (Bank FD Interest) अर्थात १.५ वर्षात ही FD मॅच्युअर होते. या बँकेने ८ टक्के हे व्याजदर २४ जानेवारी २०२४ पासून लागू केले आहेत.

4. उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक

उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक आपल्या ग्राहकांना FD साठी ७ दिवस ते १० वर्षाचा कालावधी देते. या कालावधीसाठी तयार केलेल्या FD वर ३.७५ टक्के ते ८.२५ टक्क्यांपर्यंत व्याजदर दिला जातो. (Bank FD Interest) दरम्यान, ५६० दिवसात परिपक्व होणाऱ्या मुदत ठेवीवर जास्तीत जास्त ८.२५ टक्के व्याजदराने अधिक लाभ प्रदान केला जातो. हा व्याजदर उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेने १ जून २०२३ पासून लागू केला आहे.

5. ESAF स्मॉल फायनान्स बँक

ESAF स्मॉल फायनान्स बँकसुद्धा सामान्य नागरिकांना गुंतवणुकीची चांगली संधी देते. या बँकेत FD करण्यासाठी ७ दिवस ते १० वर्षाचा कालावधी उपलब्ध आहे. तसेच या एफडीवर ४ टक्के ते ८.२५ टक्क्यांपर्यंत व्याज दिले जाते. या FD च्या परिपक्वतेचा कालावधी २ ते ३ वर्षापेक्षा कमी आहे. (Bank FD Interest) या FD वर कमाल ८.२५ टक्के इतके दिले जाते. हे व्याजदर ESAF स्मॉल फायनान्स बँकेने १ जानेवारी २०२४ पासून लागू केले आहेत.

6. जन स्मॉल फायनान्स बँक

जन स्मॉल फायनान्स बँकही ग्राहकांना FD साठी ७ दिवस ते १० वर्षाचा कालावधी देते. या FD वर ही बँक आपल्या ग्राहकांना ३ टक्के ते ८.५० टक्के इतके व्याजदर देते. या बँकेत तयार केलेली ३६५ दिवसात मॅच्युअर होणाऱ्या FD वर कमाल ८.५० टक्के व्याज उपलब्ध आहे. हे व्याजदर जन स्मॉल फायनान्स बँकेने २ जानेवारी २०२४ पासून लागू केले आहेत. (Bank FD Interest)