Bank FD Rules : बँकेत 5 लाखापेक्षा जास्त रक्कम ठेवण्याआधी ‘हा’ नियम जाणून घ्या; अन्यथा नुकसान निश्चित

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Bank FD Rules) आजकाल प्रत्येकाचं बँकेत एक तरी बचत खात असतंच. ज्यामध्ये आपली महिन्याची कमाई अर्थात पैसे जमा केले जातात. बँकेत खात असण्याचे बरेच फायदे असतात. मात्र ते फायदे कसे घेता येतील याविषयी आपल्याला पूर्ण माहिती असणे गरजचे असते. जी बँक जास्त व्याजदर देते त्या बँकेत सर्वाधिक खाती उघडली जातात. कारण अशा बँकांकडे ग्राहकांचा विशेष कल असतो.

दरम्यान, तुम्हाला तुमचे खाते ज्या बँकेत आहे त्या बँकेचे सर्व नियम माहिती असायला हवेत. कारण नुकताच अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पातील एका नियमात बदल केला आहे. (Bank FD Rules) ज्यानुसार, तुम्ही तुमच्या बँक अकाउंटमध्ये ठेवलेल्या रकमेतील केवळ ५ लाख रुपयांपर्यंतची रक्कम सुरक्षित असल्याचे स्प्ष्ट केले आहे. याविषयी अधिक आणि सविस्तर माहिती घेऊयात.

मंत्रिमंडळाचा निर्णय

बँकेत खाते असणाऱ्या ग्राहकांच्या हितासाठी मंत्रिमंडळाने एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, ग्राहकांना ३ महिन्यांत ठेव विमा दावे मिळू शकतात. (Bank FD Rules) दरम्यान, तुमच्या बँकेवर स्थगन लादले गेले तर ग्राहक DICGC कायद्यानुसार तुम्हाला ९० दिवसांच्या आत ५ लाख रुपये सुरक्षित सुपूर्त केले जाऊ शकतात. याबाबत सरकारने ठेव विमा आणि क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (DICGC) कायद्यात सुधारणा केली आहे.

नियमात काय बदल केले? (Bank FD Rules)

पूर्वी बँक गॅरेंटीची रक्कम ही केवळ १ लाख रुपये होती. मात्र ४ फेब्रुवारी २०२० मध्ये सादर केलेल्या अर्थ संकल्पात ५ लाख रुपये इतकी बँक हमी केली गेली. फेब्रुवारी २०२० मध्ये हा नियम लागू झाल्यानंतर आता कोणतीही बँक बुडाली तरी ग्राहकांच्या खात्यातील ५ लाख रुपयांपर्यंतची ठेव सुरक्षित राहील. मात्र ५ लाखापेक्षा जास्त रक्कम खात्यात असेल तर त्यावरील रकमेवर तुम्ही दावा करू शकत नाही.

तर नुकसान होईल…

समजा तुम्ही तुमच्या बँक खात्यात ५ लाख रुपयांची FD केली आहे आणि त्याच बँकेत ३ लाख रुपये सुद्धा जमा केले आहेत. (Bank FD Rules) अशात तुमचे खाते ज्या बँकेत आहे ती बँक जर का बुडाली तर मात्र तुम्हाला केवळ ५ लाख रुपये परत मिळतील. तुमच्या खात्यात ५ लाखापेक्षा जास्त पैसे असले तरीही केवळ ५ लाख रुपये तुम्हाला बँक परत देईल. समजा एखाद्याच्या खात्यात १० लाख रुपये आहेत. शिवाय त्याने वेगळी FD केली आहे. तर लक्षात घ्या, अशावेळी बँक बुडाल्यास तुमच्या ५ लाख रुपयांचाच विमा काढला जाईल.

पैसे वाचवता येतील?

तज्ञांच्या मते, गेल्या ५० वर्षांत देशात क्वचितच कुठली तरी बँक दिवाळखोरीत निघाली आहे. त्यामुळे तुम्ही तुमचे पैसे वेगवेगळ्या बँकांमध्ये ठेवू शकता. यामुळे ठेव विमा संरक्षण मिळेल. परिणामी तुमचा पैसा वाचेल. (Bank FD Rules)