हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नवीन वर्षाची सुरुवात काही दिवसातच होणार असून, बँकेची कामे नियोजनपूर्वक करण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) जानेवारी 2025 मधील बँक सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. RBI ने आपल्या अधिकृत संकेतस्थळावर ही यादी उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे जर तुम्हाला या महिन्यात बँकेशी संबंधित कोणतीही कामे करायची असतील, तर या सुट्ट्यांचा विचार करूनच नियोजन करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. तर चला जाणून घेऊयात जानेवारी महिन्यात कोणकोणत्या दिवशी बँका बंद असणार आहेत.
जानेवारी 2025 मधील बँक सुट्ट्या –
जानेवारी 2025 मध्ये बँकांची सुट्ट्यांची यादी विविध राज्यांमध्ये भिन्न असू शकते. 1 जानेवारी रोजी नववर्षानिमित्त काही बँका बंद राहतील. 5 जानेवारी आणि 19 जानेवारी हे आठवड्याच्या सुट्टीचे दिवस असतील. 11 जानेवारी रोजी दुसरा शनिवार, 12 जानेवारी स्वामी विवेकानंद जयंती आणि आठवड्याची सुट्टी असेल. 14 जानेवारी रोजी मकर संक्रांत किंवा पोंगलच्या निमित्ताने आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि तेलंगणामध्ये बँका बंद राहतील. 15 जानेवारी रोजी माघ बिहू किंवा संक्रांतीच्या दिवशी तामिळनाडू, आसाम आणि इतर राज्यांमध्ये सुट्टी असेल. 16 जानेवारी रोजी उज्जावर तिरुनल, जे तामिळनाडूत बँकांसाठी बंद असणारा दिवस असेल. 22 जानेवारी रोजी इमोइन सण मणिपूरमध्ये, तर 23 जानेवारी रोजी नेताजी सुभाष चंद्र बोस जयंतीच्या निमित्ताने मणिपूर, ओडिशा, पंजाब, सिक्किम, पश्चिम बंगाल, जम्मू-कश्मीर आणि दिल्लीतील बँका बंद राहतील. 25 जानेवारी रोजी चौथा शनिवार, तर 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन राष्ट्रीय सुट्टी म्हणून जाहीर केलेली आहे. 30 जानेवारी रोजी सिक्किममधील बँका सोनम लोसर सणाच्या निमित्ताने बंद असतील.
सुट्ट्यांचे वेळापत्रक विविध राज्यानुसार वेगळे –
सुट्ट्यांचे हे वेळापत्रक विविध राज्यांतील स्थानिक उत्सव व राष्ट्रीय सुट्ट्यांवर आधारित आहे. या दिवसांव्यतिरिक्त काही राज्यांमध्ये स्थानिक कारणांमुळेही बँका बंद असू शकतात. त्यामुळे जर तुम्हाला बँकेची महत्त्वाची कामे असतील, तर या सुट्ट्यांचा विचार करूनच आपली कामे करून घ्यावीत . तसेच या सुट्ट्या जाहीर केल्या असल्या तरी तुम्हाला ऑनलाइन बँकिंग सेवा 24×7 उपलब्ध असणार आहेत. त्यामुळे अनेक सेवा घरबसल्या करता येऊ शकतात.