हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Bank Holidays List – मार्च महिन्यात बँकांच्या सुट्ट्यांची यादी जाणून घेणे आर्थिक नियोजनासाठी महत्त्वाचे आहे. या महिन्यात अनेक सण आणि सार्वजनिक सुट्ट्या असल्यानं, बँकांचे कामकाज बंद राहणार आहे. 1 मार्चला रामकृष्ण जयंती ही सुट्टी पश्चिम बंगाल, ओडिशा आणि आसाम राज्यांमध्ये लागू असल्यानं, या राज्यांतील बँका बंद राहतील. इतर राज्यांमध्ये मात्र बँका सुरु राहतील. त्यामुळे ग्राहकांना त्यांच्या राज्यातील सुट्ट्यांची माहिती घेणे आवश्यक आहे. आरबीआयच्या वेबसाइटवरून तुम्ही तुमच्या राज्यातील सुट्ट्यांची माहिती मिळवू शकता. मार्च महिन्यात एकूण 14 दिवस बँका बंद राहणार आहेत. यामध्ये 5 रविवार आणि दुसऱ्या-चौथ्या शनिवारांचा समावेश आहे.
मार्च महिन्यातील महत्त्वाच्या सुट्ट्या (Bank Holidays List) –
2 मार्च – रविवारची सुट्टी
7 आणि 8 मार्च – चापचर कुट महोत्सव (ऐझॉल)
9 मार्च – दुसरा शनिवार
13 मार्च – होलिका दहन (डेहराडून, कानपूर, लखनऊ, रांची, तिरुवंगपुरम)
14 मार्च – होळी
15 मार्च – याओसेंग दिवस (अगरतळा, भुवनेश्वर, इंफाळ, पटना)
16 मार्च – रविवारची सुट्टी
22 मार्च – चौथा शनिवार आणि बिहार दिवस
23 मार्च – रविवारची सुट्टी
27 मार्च – शब-ए-कद्र (जम्मू, श्रीनगर)
28 मार्च – जमात जम्मू, श्रीनगर उल विदा
30 मार्च – रविवारची सुट्टी
31 मार्च – ईद उल फितर, पण आरबीआयने या दिवशी बँका खुल्या ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.
बँक सुट्ट्यांचा परिणाम –
बँक सुट्ट्यांमुळे (Bank Holidays List) तुम्ही तुमचे आर्थिक काम ऑनलाइन बँकिंगद्वारे पूर्ण करू शकता. एटीएमच्या माध्यमातूनही पैशाचे व्यवहार करणे शक्य आहे. म्हणूनच, बँक सुट्ट्यांची यादी जाणून घेणे महत्त्वाचे आहे.




