बँक ऑफ महाराष्ट्राच्या FD व्याजदरात बदल ; जाणून घ्या काय आहेत नवीन दर ?

BOM
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अनेक बँकांनी त्यांच्या फिक्स डिपॉझिटमध्ये बदल केले असून , आता बँक ऑफ महाराष्ट्रने सुद्धा FD योजनांवरील व्याजदरांमध्ये बदल केला आहे. या बँकेने सामान्य नागरिक आणि वरिष्ठ नागरिकांसाठी 7 ते 10 वर्षांच्या कालावधीसाठी एफडी उपलब्ध करून दिला आहे. बँकेचे नवीन दर 14 नोव्हेंबर 2024 पासून लागू झाले असून, सामान्य नागरिकांना बँक 2.75% ते 7.35% वार्षिक व्याज दर ऑफर करत आहे.

स्पेशल एफडीवरील व्याजदर –

बँक ऑफ महाराष्ट्रने आपल्या स्पेशल एफडी योजनांवरील आकर्षक व्याजदर जाहीर केले आहेत. 200 दिवसांच्या एफडीसाठी 6.90%, 333 दिवसांच्या एफडीसाठी 7.35%, 400 दिवसांच्या एफडीसाठी 7.10%, आणि 777 दिवसांच्या एफडीसाठी 7.75% वार्षिक व्याजदर निश्चित करण्यात आले आहेत. या योजना निश्चित आणि सुरक्षित गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम पर्याय आहेत. ग्राहकांनी या विशेष योजना निवडून चांगल्या परताव्याचा लाभ घ्यावा.

वरिष्ठ नागरिकांसाठी व्याजदर –

या बँकेने वरिष्ठ नागरिकांसाठी 2.75% ते 7.85% पर्यंत वार्षिक व्याजदर निश्चित केले आहेत, ज्यामुळे सुरक्षित आणि निश्चित रिटर्न मिळवू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी या योजना जास्त फायदेशीर ठरतात. 200 दिवसांच्या एफडीवर 7.40%, 333 दिवसांच्या एफडीवर 7.85%, 400 दिवसांच्या एफडीवर 7.60%, आणि 777 दिवसांच्या एफडीवर 7.75% व्याजदर उपलब्ध आहे. विशेष म्हणजे या योजना दीर्घकालीन वित्तीय स्थैर्यासाठी एक चांगला पर्याय ठरतो . वरिष्ठ नागरिकांनी या आकर्षक व्याजदरांचा लाभ घेऊन त्यांच्या गुंतवणुकीचे संरक्षण आणि वाढ निश्चित करावी .

सामान्य एफडीवरील व्याजदर

सर्वसामान्य ग्राहकांसाठी तसेच वरिष्ठ नागरिकांसाठी विविध कालावधीसाठी फिक्स डिपॉझिटवर चांगले व्याजदर निश्चित केले आहेत. 7 ते 30 दिवसांच्या एफडीसाठी सामान्य नागरिकांसाठी आणि वरिष्ठ नागरिकांसाठी समान 2.75% व्याजदर आहे, तर 31 ते 45 दिवसांसाठी 3% दर लागू आहे. 46 ते 90 दिवसांच्या एफडीवर 4.75%, तर 91 ते 119 दिवसांच्या एफडीवर सामान्य नागरिकांसाठी 5% आणि वरिष्ठ नागरिकांसाठी 5.50% व्याजदर दिला जातो.

120 ते 180 दिवसांच्या एफडीवर व्याजदर –

120 ते 180 दिवसांच्या एफडीवर सामान्य ग्राहकांना 5.25% आणि वरिष्ठ नागरिकांना 5.75% व्याजदराचा लाभ मिळतो. 181 ते 270 दिवसांच्या कालावधीसाठी हा दर अनुक्रमे 5.75% आणि 6% आहे. एक वर्षासाठी सामान्य नागरिकांसाठी 6.75% आणि वरिष्ठ नागरिकांसाठी 7.25% दर निश्चित करण्यात आले आहेत.

विविध वर्षासाठी एफडी योजना योग्य –

1 ते 2 वर्षांपर्यंतच्या एफडीवर सामान्य ग्राहकांना 6.50% आणि वरिष्ठ नागरिकांना 7% दर मिळतो आणि 2 ते 5 वर्षांच्या कालावधीसाठीही तोच दर लागू आहे. 5 ते 10 वर्षांच्या कालावधीसाठी सामान्य नागरिकांसाठी 6.50% तर वरिष्ठ नागरिकांसाठी 7% व्याजदर दिला जातो. वेगवेगळ्या पर्यायांसोबत निश्चित रिटर्न मिळवण्यासाठी या एफडी योजना योग्य ठरू शकतात.