Barley Water Benefits : उन्हाळ्यात प्या ‘हे’ चमत्कारिक पेय; डिहायड्रेशनसोबत इतर समस्याही होतील दूर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Barley Water Benefits) कडक उन्हाळा सुरु झाला की, अगदी निरोगी माणसाला देखील आरोग्याची चिंता वाटू लागते. कारण उन्हाळ्यात सर्वाधिक प्रमाणात उष्माघात, निर्जलीकरण अशा समस्या उदभवतात. शरीरातील पाणी कमी झाल्याने डिहायड्रेशनची समस्या होते आणि परिणामी इतर बऱ्याच गंभीर समस्या उदभवू शकतात. त्यामुळे या काळात सतत पाणी पिणे, फळांचे रस किंवा रसदार फळांचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. अशा दिवसात शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी आणि डिहायड्रेशनची समस्या दूर करण्यासाठी बार्लीचे पाणी फायदेशीर ठरते. चला तर याविषयी अधिक माहिती घेऊया.

पौष्टिक बार्ली

बार्ली हे एक पौष्टिक धान्य आहे. ज्यामध्ये विविध आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. तसेच बार्लीच्या बिया फायबर, जीवनसत्त्व बी, लोह, मॅग्नेशियम व सेलेनियमचा चांगला स्रोत आहे. (Barley Water Benefits) हे पोषक घटक एकंदर आरोग्य आणि ऊर्जा पातळी वाढविण्यासाठी फायदेशीर आहेत.

‘असे’ बनवा बार्लीचे पाणी

उन्हाळ्याच्या दिवसात बार्लीचे पाणी पिणे अत्यंत फायदेशीर ठरते. यासाठी बार्ली काही वेळ धुऊन, त्यातील पाणी काढून टाका. त्यानंतर स्वच्छ झालेल्या बार्लीच्या बिया ४.५ कप पाण्यात ७-८ तास चांगल्या भिजवा. (Barley Water Benefits) यानंतर हे पाणी १० मिनिटे उकळवा. बार्लीचे घटक पाण्यात उतरल्यास पाणी पांढरे होईल. आता गॅस बंद करून बार्लीच्या बिया बाजूला काढा आणि पाणी गाळून घ्या. हे पाणी थंड होताच त्यात लिंबाचा रस आणि चवीनुसार मीठ घालून याचे सेवन करा.

बार्लीचे पाणी पिण्याचे फायदे (Barley Water Benefits)

  1. बार्लीच्या पाण्याचे सेवन केल्यास उन्हाळ्याच्या दिवसांत शरीर हायड्रेटेड ठेवण्यास मदत होते. बार्लीचे पाणी तहान भागवते आणि प्रभावीपणे शरीरावर काम करते. हे असे पेय आहे, जे तुम्हाला हायड्रेटेड ठेवते आणि इलेक्ट्रोलाइट्सचा पुरवठा करते.
  2. बार्लीच्या पाण्यात नैसर्गिकरी थंडावा निर्माण करण्याचे विशेष गुणधर्म असतात. शरीराच्या वाढत्या तापमानावर नियंत्रण करतात. त्यामुळे शरीरातील उष्णता कमी होते.
  3. उन्हाळ्याच्या दिवसात अनेकांना पचनाच्या समस्या जाणवतात. मात्र, बार्लीचे पाणी प्यायल्यास त्यातील विरघळणारे फायबर आपले पाचन तंत्र निरोगी ठेवतात. (Barley Water Benefits)
  4. बार्लीच्या पाण्यात फायबर असते जे बराच काळ पोटाला आधार देते. त्यामुळे खाण्याची अनावश्यक लालसा कमी होते आणि वजन नियंत्रित राहण्यास मदत होते.
  5. बार्लीचे पाणी हे शरीरासाठी नैसर्गिक डिटॉक्सिफायर म्हणून काम करते. हे पाणी प्यायल्यास शरीरातील विषारी आणि टाकाऊ पदार्थ बाहेर पडायला मदत होते.

‘या’ रुग्णांनी बार्लीचे पाणी पिऊ नये

ग्लुटेन सेन्सिटिव्हीटी,
ऑटोइम्युन विकार,
सेलिअॅक,
थायरॉईडायटिस,
संधिवात असे आजार असलेल्या लोकांनी बार्लीचे पाणी पिणे टाळले पाहिजे. (Barley Water Benefits)