Beauty Care : फेस मास्क लावताना ‘ही’ चूक पडेल महागात; चेहरा होईल निस्तेज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Beauty Care) सुंदर, तेजस्वी आणि नितळ त्वचा कुणाला नको असते? त्यामुळे प्रत्येकजण आपल्या चेहऱ्यावर वेगवेगळे प्रयोग करत असतात. कधी घरगुती उपाय तर कधी महागड्या ब्युटी ट्रीटमेंट्स घेऊन सुंदर दिसण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न असतो. अनेक लोक चमकदार त्वचेसाठी विविध प्रकारचे फेस मास्क वापरतात. फेस मास्कमुळे चेहऱ्यावरील त्वचा हायड्रेट होते. परिणामी मऊ, मुलायम त्वचेसह चेहरा ताजा तवाना फ्रेश दिसू लागतो. चेहऱ्यावर एक वेगळा ग्लो येतो. शिवाय चेहऱ्यावरील धूळ आणि पोअर्समध्ये अडकलेले मातीचे कण काढून टाकण्यासाठी फेस मास्क फायदेशीर ठरतो.

पण तुम्हाला माहित आहे का? फेस मास्क वापरताना काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात. फेस मास्कचा वापर करतेवेळी आपल्याकडून काही चुका होण्याची शक्यता असते. जी नंतर भारी पडते. (Beauty Care) सुंदर, तजेलदार आणि चमणारी त्वचा मिळवण्यासाठी फेस मास्कचा वापर करताना या चुका केल्या तर अगदी उलट परिणाम पहायला मिळतात. अनेकदा फेस पॅकच्या वापरानंतर आपली त्वचा निस्तेज आणि निर्जीव दिसू लागते. त्याचं कारण म्हणजे अनेकदा मुली फेस पॅक आणि मास्क लावताना काही चुका करतात. ज्याविषयी आज आपण माहिती घेणार आहोत. म्हणजे यापुढे तुम्ही फेसपॅक लावताना या चुका टाळू शकाल आणि त्यामुळे तुमचा चेहरा निस्तेज होणार नाही.

फेस मास्क लावताना ‘या’ चुका करू नका (Beauty Care)

1. चेहरा न धुणे

फेस मास्क वापरण्यापूर्वी कधीही चेहरा स्वच्छ पाण्याने आणि तुमच्या त्वचेला सूट होणाऱ्या फेसवॉशने धुवा. यामुळे चेहऱ्याच्या त्वचेवर जमा झालेले अतिरिक्त तेल आणि पोअर्स मध्ये साचलेली घाण साफ होते. मात्र चेहरा न धुता फेस मास्कचा वापर केलात तर फायद्याऐवजी त्वचेला मोठं नुकसान सहन करावं लागेल. त्यामुळे काहीही झालं तरी फेस मास्क वापरण्यापूर्वी प्रथम हात आणि चेहरा धुवा. (Beauty Care)

2.फेसपॅकचा अतिवापर टाळा

आपण सारेच जाणतो की, अति तेथे माती. अर्थात कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा त्रासदायी ठरतो. त्यामुळे जर तुम्हाला फेसपॅकदररोज वापरायची सवय असेल किंवा तुम्ही एकावेळी प्रमाणापेक्षा जास्त फेस पॅकचा वापर करत असाल तर ही तुमची सगळ्यात मोठी चूक आहे. (Beauty Care) अशा अति वापरामुळे तुमच्या चेहऱ्यावरील त्वचा कोरडी होऊ शकते. शिवाय चेहरा लाल होणे आणि सुरकुत्या दिसणे यांसारख्या दुष्परिणामांना सामोरे जावे लागते.

3. फेसमास्क जास्त काळ त्वचेवर ठेवू नका

बहुतांशी लोकांचा असा समज आहे की, चेहऱ्यावर बराचवेळ फेसपॅक लावून ठेवल्याचे जास्त लाभ मिळतो. पण हा एक गैरसमज आहे. उलट चेहऱ्यावर अधिक काळासाठी फेस मास्क लावणे त्वचेसाठी हानिकारक ठरू शकते. कारण फेसपॅकमध्ये काही अशा गोष्टी मिसळल्या असतात ज्या चेहऱ्याच्या त्वचेला हानी पोहोचवू शकतात. (Beauty Care) आपल्या चेहऱ्यावरील त्वचा अतिशय नाजूक असते. त्यामुळे कोणताही फेस मास्क चेहऱ्यावर अधिक काळासाठी लावणे टाळा.

4. पॅकेजिंग न पाहता फेसपॅक वापरणे

अनेकद फेस पॅक लावण्याच्या उत्साहात आपण पॅकेजिंग कडे लक्ष देत नाही. कोणताही फेसमास्क वापरण्याआधी त्याची पॅकेजिंग डेट आणि एक्स्पायरी डेट तपासून पहावी. (Beauty Care) शिवाय त्या फेसपॅकमध्ये कोणकोणत्या पदार्थांचा वापर करण्यात आला आहे याकडे बारकाईने लक्ष द्यावे. कारण फेसपॅकमध्ये विविध गोष्टींचा वापर केलेला असतो. यांपैकी एखाद्या गोष्टीची तुम्हाला ऍलर्जी असेल तर तुमच्यासाठी तो फेसपॅक हानिकारक ठरू शकतो. यासाठी त्याच्या पॅकेजिंगच्या मागील बाजूस दिलेल्या सूचना नीट वाचून त्याचे पालन करा.

5. फेस मास्क काढताना चेहरा चोळणे किंवा नखांचा वापर करणे

फेस पॅक लावून झाल्यानंतर तो सुकला की धुवून टाकायचा ही प्रक्रिया सगळ्यांना माहित आहे. पण चेहरा धुताना सुकलेला फेसमास्क काढण्यासाठी नखांचा वापर करणे किंवा हाताने त्वचा चोळणे अशा सवयी तुम्हाला असतील तर याचे गंभीर परिणाम भोगायला तयार रहा. कारण यामुळे चेहऱ्यावर रॅशेस येतात, चेहरा लाल पडतो आई काहीवेळा रिऍक्शन होऊ शकते. (Beauty Care)